हिरव्या मिरचीचे भाव पडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 05:00 IST2020-04-23T05:00:00+5:302020-04-23T05:00:58+5:30
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकाचे उत्पादन घेतले जाते. लाखनी तालुक्याच्या पालांदूर परिसरातील चुलबंद नदीखोºयात मोठ्या प्रमाणात बागायती शेती केली जाते. अनेक शेतकºयांनी बागायती शेतीवर प्रगती साधली आहे. मात्र आता कोरोनाचे नवे संकट आले आणि शेतकरी हतबल झाले आहे. प्रचंड मेहनत करून शेतात पिकविलेल्या भाजीपाल्याला बाजारात भावच मिळत नाही.

हिरव्या मिरचीचे भाव पडले
मुखरु बागडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : कोरोनाच्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत असून मागणी कमी आणि पुरवठा अधिक अशी अवस्था झाली आहे. भाजीपाल्याचे दर अत्यल्प झाले असून हिरव्या मिरचीला आता प्रतिकिलो केवळ दहा रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे हिरवी मिरची लाल करण्याच्या नियोजनात शेतकरी दिसत आहेत.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकाचे उत्पादन घेतले जाते. लाखनी तालुक्याच्या पालांदूर परिसरातील चुलबंद नदीखोºयात मोठ्या प्रमाणात बागायती शेती केली जाते. अनेक शेतकºयांनी बागायती शेतीवर प्रगती साधली आहे. मात्र आता कोरोनाचे नवे संकट आले आणि शेतकरी हतबल झाले आहे. प्रचंड मेहनत करून शेतात पिकविलेल्या भाजीपाल्याला बाजारात भावच मिळत नाही. शेतात काढणीसाठी मजूर नाही आणि बाजारात भाव नाही. अशा संकटात शेतकरी आले आहेत. सध्या हिरव्या मिरच्या मोठ्या प्रमाणात तोडणीला आले आहेत. ग्रामीण भागात मिरचीला तेवढी मागणी नसते. त्यामुळे शहरातील बाजारात शेतकरी मिरची घेऊन जात आहेत. परंतु तेथे हिरव्या मिरचीला प्रती किलो १० रुपये भाव मिळत आहे. यातून लागवडीचा खर्चही मिळणे कठीण झाले आहे. आता यावर मात करण्यासाठी शेतकºयांनी मिरची न तोडता त्या लाल होण्याची प्रतीक्षा करीत आहेत. लाल मिरच्यांचे उत्पादन घेण्यासाठी आता शेतकरी सरसावला आहे. अनेक हिरव्यागार शेतात लाल मिरच्या दिसत आहेत. कोरोनाच्या या संकटाने शेतकºयांवर मोठे आर्थिक संकट आणून टाकले आहे.
लागवडीचा खर्च निघणे झाले कठीण
अनेक शेतकरी बागायती पिके घेऊन आपला चरितार्थ चालवितात. फुलकोबी, वांगे, टमाटर, मिरची, भेंडी यासह विविध पालेभाज्या पिकविल्या जातात. परंतु लॉकडाऊनने भाजीपाला माल विकणे अडचणीचे झाले आहे. लावलागवडीचा खर्चही निघणे कठीण झाले असल्याचे पालांदूर येथील बागातदार पद्माकर कडूकार यांनी सांगितले.