शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:37 IST

तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. तो खरा ठरत आहे. बुधवारी ...

तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. तो खरा ठरत आहे. बुधवारी (दि. १९) सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. जवळपास १५ मिनिटे पडलेल्या पावसामुळे रस्त्यावर पाण्याचे लोट निघाले होते. वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड झाली, तर काही व्यावसायिक प्रतिष्ठानांच्या टिनाच्या छताचीसुध्दा पडझड झाली होती.

जिल्ह्यात रब्बी धानाची कापणी आणि मळणीची कामे सुरू आहेत. त्यातच अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुधवारी आलेल्या वादळी पावसाचा तडाखा कापणी केलेल्या ६ ते ७ हजार हेक्टरमधील धानाला बसला. धानाचा कडपा भिजल्याने धान पाखड होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांना दुहेरी संकटाला तोंड द्यावे लागत आहे. हवामान विभागाने पुढील दोन - तीन दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला असल्याने शेतकऱ्यांवरील अवकाळीचे संकट कायम आहे.

उघड्यावरील धानाला फटका

जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने मागील खरीप हंगामात ३३ लाख क्विंटल धान खरेदी केले. त्यापैकी जवळपास दीड लाख क्विंटल धान उघड्यावर पडले आहे. या धानाला मागील सात - आठ दिवसांपासून येत असलेल्या अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धानाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

तूर्तास धान कापणी नकोच

यंदा रब्बी हंगामात जिल्ह्यात एकूण ६६ हजार हेक्टरवर रब्बी धानाची लागवड करण्यात आली आहे. यापैकी ७ ते ८ हजार हेक्टरमधील धानाची कापणी पूर्ण झाली असून, अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील बांधामध्ये धान पडून आहे. या धानाला बुधवारी आलेल्या अवकाळी पावसाचा फटका बसल्याने नुकसान झाले. तसेच हवामान विभागाने पुढील दोन-तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे कृषी विभागाने तूर्तास धानाची कापणी न करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे.