शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

धानाचे अवशेष न जाळता सेंद्रिय खत तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 5:00 AM

दिवसेंदिवस शेतीत विविध प्रयोग साकारले जात आहेत. जमिनीचा पोत कायम राहून खर्च कमी करीत अधिक उत्पन्नकरिता कृषी विभाग विविध प्रयोग करीत आहे. असाच एक प्रयोग तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर यांनी प्रायोगिक तत्त्वावर हाती घेतला आहे. यात दिल्ली इथून पुसा वेस्ट डिकम्पोझर कॅप्सूलची मागणी करून त्यापासून वेस्ट डिकम्पोझर  द्रावण तयार केले गेले.

मुखरू बागडे पालांदूर : खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, बऱ्याच शेतात धानाचे अवशेष कायम आहेत. त्या अवशेषांना जाळण्यासाठी बरेच शेतकरी पुढाकार घेतात. परंतु आता नव्या संशोधनात जैविक प्रक्रियेतून अवशेषांना वेस्ट डिकम्पोझरची फवारणी करून सेंद्रिय खत तयार होऊ शकते. प्रायोगिक तत्त्वावर लाखनी तालुक्यातील कोलारी येथे सुरेश नांदगावे यांच्या शेतावर प्रयोग करण्यात आला आहे.दिवसेंदिवस शेतीत विविध प्रयोग साकारले जात आहेत. जमिनीचा पोत कायम राहून खर्च कमी करीत अधिक उत्पन्नकरिता कृषी विभाग विविध प्रयोग करीत आहे. असाच एक प्रयोग तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर यांनी प्रायोगिक तत्त्वावर हाती घेतला आहे. यात दिल्ली इथून पुसा वेस्ट डिकम्पोझर कॅप्सूलची मागणी करून त्यापासून वेस्ट डिकम्पोझर  द्रावण तयार केले गेले. या द्रावणाचा वापर करून शेतातील काढणी झालेल्या पिकांच्या अवशेषावर फवारणी केल्यास त्यांचे सेंद्रिय खतामध्ये रूपांतर होते. एकंदरीत अवशेष जळणाने हवेतील प्रदूषण कमी करून सेंद्रिय खत तयार होण्याचा प्रयत्न अथवा प्रयोग सुरू झालेला आहे. लाखनी तालुक्यातील कोलारी येथे कृषी सहाय्यक जे. यु. नाकाडे यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रगतशील शेतकरी विजयकुमार बावनकुळे, विजय हेमने व इतर शेतकरी उपस्थित होते.

द्रावण तयार करण्याची कार्यपद्धती- पाच लीटर पाण्यात दीडशे ग्रॅम गूळ टाकून गूळ विरघळेपर्यंत गॅसवर गरम करणे. वरील गुळ पाणी गाळून थंड झाल्यानंतर ५० ग्रॅम बेसन घालून ढवळणे. त्यानंतर पुसा वेस्ट डिकंपोझर चार कॅप्सूल मोकळ्या करून त्यातील जिवाणू संवर्धक वरील मिश्रणात घालून ढवळणे व चार दिवस भांड्याला कपडा बांधून सावलीत ठेवणे. चार दिवसानंतर तयार झालेल्या द्रावणात पुन्हा साध्या पाच लीटर पाण्यात १५० ग्रॅम गूळ घेऊन गरम करून थंड द्रावण गाळून वरील चार दिवस तयार झालेल्या द्रावणात घालावे व नंतर दोन दिवस सदर भांड्याला कापडी कपडा बांधून ठेवावे. वरील तयार झालेले द्रावण १५ लीटर पंपाला ७५० मिली वापरून धानाच्या अवशेषावर फवारणी करावी व नंतर नांगरटी करून जमिनीत गाडून टाकावे. दहा लीटर द्रावण एक एकर क्षेत्राला अपेक्षित आहे. 

शेतकरी मित्रांनी पुसा वेस्ट  डिकंपोझरचा प्रयोग करावा. सुपीक शेतीकरिता हा प्रयोग अत्यल्प खर्चात घरच्या घरी करता येण्यासारखा आहे. काही समस्या आल्यास आम्ही शेतकऱ्यांच्या सहकार्यासाठी तत्पर आहोत.-जे. यु. नाकाडे,  कृषी सहाय्यक, मंडल कृषी कार्यालय, पालांदूर.शेतकऱ्यांनी प्रयोगाखातर प्रयत्न करून शेतीला पूरक सेंद्रिय खताचा वापर करावा. हळूहळू रासायनिक शेती कमी करावी. अर्थात खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ करण्याचा प्रयत्न करावा. खर्च कमी झाल्यास व उत्पन्न वाढल्यास निश्चितच शेती फायद्याची ठरेल. होतकरू शेतकऱ्यांनी निश्चितच प्रयोगाकरिता पुढे यावे.-किशोर पात्रीकर, तालुका कृषी अधिकारी, लाखनी.

 

टॅग्स :agricultureशेती