पं.स. सदस्यांचा सभेवर बहिष्कार
By Admin | Updated: February 19, 2016 01:03 IST2016-02-19T01:03:04+5:302016-02-19T01:03:04+5:30
तुमसर पंचायत समितीच्या २० सदस्यांनी गुरूवारी होणाऱ्या मासिक सभेवर बहिष्कार घालून खंडविकास अधिकाऱ्यांना

पं.स. सदस्यांचा सभेवर बहिष्कार
तुमसर : तुमसर पंचायत समितीच्या २० सदस्यांनी गुरूवारी होणाऱ्या मासिक सभेवर बहिष्कार घालून खंडविकास अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात घेराव घातला. मागील सहा महिन्यापासून पंचायत समिती मासिक सभेत तालुक्यातील विविध विभागातील अधिकारी गैरहजर राहत असल्याने विकास कामांना खीळ बसत असल्याचा आरोप सदर पंचायत समिती सदस्यांनी केला आहे.
तुमसर पंचायत समितीची मासिक सभा गुरूवारी ठेवण्यात आली होती, परंतु पंचायत समिती अधिकारी वगळता इतर विभागाचे उपअभियंता, जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग, वनक्षेत्र अधिकारी, लेंडेझरी, नाकाडोंगरी, चिचोली, लघु पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद, उपअभियंता, उपविभाग,
उपअभियंता विद्युत विभाग, तालुका वैद्यकीय अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, सामाजिक वनिकरण, शालेय पोषण आहार, पशुसंवर्धन अधिकारी, राज्यस्तर उपस्थित नव्हते. संबंधित विभागाचे प्रश्न व समस्या कुणाला विचारावे, असा प्रश्न पंचायत समिती सदस्यांनी खंडविकास अधिकारी केशव गड्डापोड यांना विचारून धारेवर धरले. मागील सहा महिन्यापासून कोणत्या ना कोणत्या विभागाचे अधिकारी महिन्याच्या सभेला उपस्थित राहत नाही त्यामुळे लोकप्रतिनिधींचा हा अपमान असल्याचे म्हटले आहे. (तालुका प्रतिनिधी)