शब्दाच्या ताकदीने जगाचे विश्लेषण सोपं होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:34 IST2021-01-20T04:34:33+5:302021-01-20T04:34:33+5:30

वरठी : साहित्य क्षेत्र व्यापक आहे. साहित्य लिखाण करणाऱ्यांचे शब्द सामर्थ्याने जगाचे विश्लेषण सोपं होते. मानवी स्वभाव, गुण-दोष व ...

The power of words makes it easy to analyze the world | शब्दाच्या ताकदीने जगाचे विश्लेषण सोपं होते

शब्दाच्या ताकदीने जगाचे विश्लेषण सोपं होते

वरठी : साहित्य क्षेत्र व्यापक आहे. साहित्य लिखाण करणाऱ्यांचे शब्द सामर्थ्याने जगाचे विश्लेषण सोपं होते. मानवी स्वभाव, गुण-दोष व नैसर्गिक रचनेचे महत्व साहित्याने सहज रेखाटले. ग्रामीण कवी म्हणून नावारूपास असलेले प्रा. विष्णुपंत चोपकर हे त्यापैकी एक शब्द सामर्थ्याचे धनी होते असे प्रतिपादन रंजिता कारेमोरे यांनी केले.

ग्रामीण कवी प्रा. विष्णुपंत चोपकर लिखित काव्यांजली पुस्तकाचे विमोचन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

अध्यक्ष म्हणून आमदार राजू कारेमोरे व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मधुकर वाघमारे, प्रा. बबन मेश्राम, सरपंच श्वेता येळणे, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रावण मते, माजी सरपंच संजय मिरासे, उपसरपंच सुमित पाटील, नवप्रभात शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कल्याण डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य अतुल भोवते, योगेश हटवार, सामाजिक कार्यकर्ते रितेश वासनिक, संगीता सुखाणी, ओम शांती केंद्र प्रमुख उषा दीदी, प्राचार्य कमल कटारे, अरविंद येळणे, माजी मुख्याध्यापक बाबूराव चोपकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे देवदास डोंगरे, चाईल्ड हेल्प लाईनच्या वैशाली सतदेवे उपस्थित होते.

प्रा. विष्णुपंत चोपकर यांनी विविध विषयावर कविता रचल्या होते. शीघ्र कवी म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या लिखाणात ग्रामीण भाषेची झलक होती. मराठीबद्दल त्यांचे प्रचंड प्रेम लिखाणातून दिसत होते. त्यांनी रचलेले साहित्य अप्रकाशित होते. त्यांच्या हयातीत प्रकाशनाचे अपूर्ण असलेले काम त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नी लीलाबाई व मुलगी सुलभा बारइ यांनी हाती घेतले. यात ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माजी प्राचार्य श्रावण मते यांनी हातभार लावला. त्यांच्या प्रथम काव्यांजली पुस्तकाचे विमोचन आडमार राजू कारेमोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी साहित्य क्षेत्रातील अनेक नामवंत उपस्थित होते.

संचालन तथागत मेश्राम, व्यक्ती परिचय लीलाबाई बारई व आभार प्रा. शशांक चोपकर यांनी मानले. यावेळी सुलभा बारई, कमलकांत चोकपर, माधव बारई, श्यामराव रामटेके, हरिभाऊ भाजीपाले, माधुरी मदनकर, प्रतिमा चोपकर, प्रतिभा भुरे, पृथ्वीराज डोंगरे, कविता वरठे उपस्थित होते.

Web Title: The power of words makes it easy to analyze the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.