शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
6
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
7
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
8
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
9
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
10
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
11
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
12
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
13
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
14
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
15
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
16
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
17
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
18
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
19
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
20
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
Daily Top 2Weekly Top 5

वीज मिटर ‘फॉल्टी’ शेतकऱ्याला मनस्ताप

By admin | Updated: November 27, 2014 23:29 IST

शेतशिवारात लावण्यात आलेल्या कृषीपंपाचे मिटर फॉल्टी असल्यामुळे त्याचा फटका एका शेतकऱ्याला बसला आहे. वीज वितरण कंपनीने या शेतकऱ्याला २२ हजार ५० रुपयांचे बिल पाठविले आहे.

भंडारा : शेतशिवारात लावण्यात आलेल्या कृषीपंपाचे मिटर फॉल्टी असल्यामुळे त्याचा फटका एका शेतकऱ्याला बसला आहे. वीज वितरण कंपनीने या शेतकऱ्याला २२ हजार ५० रुपयांचे बिल पाठविले आहे. त्यामुळे या शेतकऱ्याची भंबेरी उडाली आहे. मारोती पैकूजी गभणे रा.जमनी असे या शेतकऱ्याचे नाव आहे. गभणे यांनी कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात मिटर फॉल्टी नसतानाही विद्युत बिल वाढीव का येत आहे याबाबत विचारणा केली होती. तसेच जर मिटर फॉल्टी असेल तर ते बदलवून देण्याची मागणीही केली होती. वीज वितरण कार्यालयाच्या वारंवार हेलपाट्या मारल्यावर वीज मिटर बदलवून देण्यात आले नाही. मात्र त्यानंतरही हा प्रकार थांबला नाही. योजनेअंतर्गत या शेतकऱ्यााने दीड वर्षांपूर्वी जुनी रक्कम टप्प्याटप्प्याने भरली आहे. मात्र सप्टेंबर २०१४ चे वीज बिल पाहून गभणे या शेतकऱ्याची चांगलीच भंबेरी उडाली. वीज वितरण कार्यालयाने त्यांना २२ हजार ५० रुपयांचे बिल पाठविले. गभणे यांनी सप्टेंबर २०१२ मध्ये ३४३० रुपयांचे बिल भरले आहे. त्यानंतर २३ आॅगस्ट २०१३ रोजी त्यांनी कार्यकारी अभियंत्यांना वीज मिटर फॉल्टी नसल्याबाबत निवेदन दिले होते. तसेच विद्युत बिल फॉल्टी म्हणून येत असल्यामुळे त्याची चौकशी करून रिडींगनुसार विद्युत बिल देण्यात यावे अशी मागणी केली होती. त्यांच्या नावाने शेतात लावण्यात आलेला वीज मिटर चालू स्थितीत होता. त्यामुळे त्याचवेळी त्याची सहानिशा करणे गरजेचे होते. मात्र शेतकऱ्याच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेण्यात आली नाही. त्यांचा ग्राहक क्रमांक ४३६०१०२००४८५ असा आहे. सद्यस्थितीत विद्युत पुरवठा बंद असतानाही फॉल्टीमिटर प्रमाणे बिल लावण्यात आले आहे. फॉल्टी असलेला विद्युत मिटर तत्काळ बदलवून सुव्यवस्थित विद्युत मिटर लावावे अशी मागणी त्यांनी त्यावेळी केली होती. आजच्या स्थितीला त्यांच्या नावे २२ हजार रुपयांचे वीज बिल आल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. एकीकडे अस्मानी संकट तर दुसरीकडे सुलतानी संकटाला या शेतकऱ्याला तोंड द्यावे लागत आहे. विद्युत मिटरची योग्य प्रकारे चौकशी करून वीज बिलात सुधारणा करून देण्यात यावी अशी मागणी मारोती गभणे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)