बचत खात्यातील पैसे देण्यास पोस्टाची टाळाटाळ (हीच बातमी यापूर्वीही एकदा वाचून दिली होती.)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:33 IST2021-03-28T04:33:07+5:302021-03-28T04:33:07+5:30
डाक उपविभाग कार्यालय मोहाडी येथे उषा सुरेश सुखदेवे या महिलेने २० एप्रिल २०१६ रोजी बचत खाते उघडून त्यात थोडे ...

बचत खात्यातील पैसे देण्यास पोस्टाची टाळाटाळ (हीच बातमी यापूर्वीही एकदा वाचून दिली होती.)
डाक उपविभाग कार्यालय मोहाडी येथे उषा सुरेश सुखदेवे या महिलेने २० एप्रिल २०१६ रोजी बचत खाते उघडून त्यात थोडे थोडे पैसे जमा केले. त्यांनी जितके पैसे जमा केले, त्याची नोंद पासबुकमध्ये करण्यात आली, परंतु त्यांनी भरलेले पैसे त्यांच्या खात्यात जमा केले नसल्याचा आरोप आहे. डिसेंबर महिन्यात त्यांनी पैसे काढण्याचा फॉर्म भरला. बँकेप्रमाणे येथेही लगेच पैसे मिळतील, असे वाटले. मात्र त्यांना तीन-चार दिवसांत तुमचे पैसे मिळतील, असे सांगण्यात आले. चार दिवसांनंतर त्या पुन्हा डाक कार्यालयात गेल्या, परंतु त्यांना पैसे देण्यात आले नाहीत. तेव्हापासून महिलेला वेगवेगळी कारणे सांगून परत पाठविण्यात आले. डाक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष पुरवून माझे पैसे मला मिळवून द्यावेत, अशी विनंती त्या महिलेने केली आहे.
कोट
महिलेच्या खात्यात व पासबुकमधील एन्ट्रीमधे तफावत आहे. त्यामुळे पासबुक तपासणीसाठी भंडारा व नंतर नागपूरला पाठविण्यात आले असल्याने वेळ लागत आहे.
- भोलाराम सोनकुसरे
पोस्टमास्टर, मोहाडी