अपघाताची शक्यता
By Admin | Updated: June 18, 2014 00:05 IST2014-06-18T00:05:13+5:302014-06-18T00:05:13+5:30
चमत्कारीक खड्डा म्हणावा तसा हा खड्डा दिसून येत आहे. कितीतरी वेळा या खड्ड्याला बुजविण्यात आले. परंतु काही दिवसांनी खड्डा जैसे थे स्थितीत दिसून येते. खुर्शिपार-मोहदुरा रस्त्याच्या

अपघाताची शक्यता
दुरुस्तीची मागणी : जीव जाण्याची शक्यता
मोहदुरा :चमत्कारीक खड्डा म्हणावा तसा हा खड्डा दिसून येत आहे. कितीतरी वेळा या खड्ड्याला बुजविण्यात आले. परंतु काही दिवसांनी खड्डा जैसे थे स्थितीत दिसून येते. खुर्शिपार-मोहदुरा रस्त्याच्या अगदी मधोमध खोलवर मोठा खड्डा पडलेला आहे. याबाबत अनेकदा संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. परंतु थातुरमातुर दुरुस्ती करण्यात येऊन पुन्हा खड्डा अगदी मधोमध असल्याने खड्ड्यात पडून अनेक अपघातसुद्धा घडलेले आहे.
परंतु संबंधित विभाग या खड्ड्याचा पूर्णपणे बंदोबस्त करण्यास सपशेल फेल ठरलेला आहे. मोहदुरा-खुर्शिपार रस्ता वर्दळीचा रस्ता आहे. दिवसा तसेच रात्रीला या रस्त्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांचे येणे-जाणे असते. काही दिवसांनी शाळा, कॉलेज सुरू होणार आहेत. आणि अशातच विद्यार्थी, शिक्षक तसेच इतर कर्मचाऱ्यांचे या रस्त्याने आवागमन वाढणार आहे. यात मधोमध असलेल्या खड्ड्यामुळे एखाद्याचा जीव जाण्याची संभावना नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने वेळीच या खड्ड्याचा पूर्णपणे योग्य तो बंदोबस्त करण्याची मागणी मोहदुरा परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)