शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

वर्षभरानंतर पाॅझिटिव्ह शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात काेराेनाचा पहिला रुग्ण २७ एप्रिल २०२० राेजी भंडारा तालुक्यातील गराडा येथे आढळून आला हाेता. त्यानंतर काेराेना रुग्णांची संख्या वाढायला लागली. कधी एक आकडी तर कधी शून्य अशी रुग्ण संख्या ५ जुलै २०२०पर्यंत हाेती. त्यानंतर रुग्णसंख्येचा आलेख वाढत गेला. एप्रिल महिन्यात काेराेनाची दुसरी लाट आली आणि रुग्ण संख्या वाढायला लागली. एप्रिल महिन्यात तर दरराेज सरासरी १२०० रुग्ण आढळून येत हाेते. मृत्यूचेही तांडव सुरू हाेते. सर्व भयभीत झाले हाेते.

ठळक मुद्देचार काेराेनामुक्त : जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९८.०४ टक्के

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तब्बल वर्षभरानंतर गुरुवारी जिल्ह्यात काेराेनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. ५२६ व्यक्तींची चाचणी केल्यानंतर सर्व नमुने निगेटिव्ह आले. ५ जुलै २०२० नंतर पहिल्यांदाच काेराेना रुग्णांची संख्या शून्य आली आहे. काेराेना ससंर्ग कमी हाेत असल्याने जिल्हा व आराेग्य प्रशासनाला माेठा दिलासा मिळाला आहे. काेराेना रुग्णांची संख्या शून्य आली असली तरी धाेका अद्याप संपलेला नाही. भंडारा जिल्ह्यात काेराेनाचा पहिला रुग्ण २७ एप्रिल २०२० राेजी भंडारा तालुक्यातील गराडा येथे आढळून आला हाेता. त्यानंतर काेराेना रुग्णांची संख्या वाढायला लागली. कधी एक आकडी तर कधी शून्य अशी रुग्ण संख्या ५ जुलै २०२०पर्यंत हाेती. त्यानंतर रुग्णसंख्येचा आलेख वाढत गेला. एप्रिल महिन्यात काेराेनाची दुसरी लाट आली आणि रुग्ण संख्या वाढायला लागली. एप्रिल महिन्यात तर दरराेज सरासरी १२०० रुग्ण आढळून येत हाेते. मृत्यूचेही तांडव सुरू हाेते. सर्व भयभीत झाले हाेते. रुग्णालयेही हाऊसफुल्ल झाली हाेती. ऑक्सिजन मिळणेही कठीण झाले हाेते. अशा स्थितीत मे महिन्यापासून थाेडा दिलासा मिळायला लागला. जून महिन्यात तर काेराेना रुग्णांची संख्या अगदी कमी व्हायला लागली. १००च्या आत काेराेना रुग्ण येऊ लागले. जूनच्या शेवटच्या आठवड्यात ही संख्या १०च्या आत आली. आराेग्य विभागासह नागरिकांनीही सुटकेचा निश्वास साेडला. त्यात गुरुवारी काेराेना रुग्णांची संख्या शून्य आल्याने माेठा दिलासा मिळाला आहे.गुरुवारी ५२६ जणांची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यात काेणत्याही तालुक्यात रुग्ण आढळून आला नाही, तर चार रुग्ण बरे हाेऊन घरी गेले. जिल्ह्याचा रुग्ण बरे हाेण्याचा दर ९८.०४ टक्क्यांवर पाेहाेचला आहे. गत महिनाभरापासून मृत्यूची संख्याही कमी झाली आहे. गत काही दिवसात तर मृत्यूची नाेंद झाली नाही. मात्र आतापर्यंत ११२८ व्यक्तींचा काेराेनाने मृत्यू झाला. त्यात भंडारा ५१७, माेहाडी ९८, तुमसर १२९, पवनी ११२, लाखनी ९८, साकाेली १०५, लाखांदूर ६९ व्यक्तींचा समावेश आहे. काेराेना संसर्ग गत काही दिवसांपासून कमी हाेत असल्याने नागरिक काेराेना नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. बाजारातही माेठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. 

जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ३६- रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण वाढत असल्याने काेराेना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी हाेत आहे. गुरुवारी जिल्ह्यात ३६ ॲक्टिव्ह रुग्ण हाेते. त्यात भंडारा ६, माेहाडी ३, तुमसर ५, पवनी तीन, लाखनी ६, साकाेली आठ, लाखांदूर पाच रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५९ हजार ४८२ व्यक्तिंना काेराेनाची लागण झाली हाेती. त्यापैकी ५८ हजार ३१८ व्यक्ती काेराेनामुक्त झाल्या असून, ११२८ व्यक्तिंचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्याचा मृत्यूदर १.९० टक्के आहे.

गुरुवारी केलेल्या काेराेना चाचण्यांमध्ये जिल्ह्यात काेराेना पाॅझिटिव्ह रुग्ण संख्या शून्य आली. ही दिलासादायक बाब आहे. असे असले तरी धाेका मात्र अजूनही संपला नाही. काेराेनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा हाेत असताना नागरिकांनी अधिक सावध राहाणे आवश्यक आहे. नागरिकांनी काेराेना नियमांचे पालन करावे.संदीप कदमजिल्हाधिकारी, भंडारा

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या