सकारात्मक विचारांमुळे मनोबल वाढते - बारई
By Admin | Updated: March 8, 2016 00:28 IST2016-03-08T00:28:14+5:302016-03-08T00:28:14+5:30
बदलत्या परिस्थितीत मानव जातीला शांतता शोधावी लागत आहे. हे घडण्याला मुळ कारण म्हणजे नकारात्मक विचारसरणी वाढीस लागलेली आहे.

सकारात्मक विचारांमुळे मनोबल वाढते - बारई
पवनी : बदलत्या परिस्थितीत मानव जातीला शांतता शोधावी लागत आहे. हे घडण्याला मुळ कारण म्हणजे नकारात्मक विचारसरणी वाढीस लागलेली आहे. प्रत्येकाने सकारात्मक विचार केल्यास ते विचार मनोबल वाढविण्यास मदत करतील व शांतता शोध्याची गरज पडणार नाही असे विचार वनक्षेत्राधिकारी आर. एन. बारई यांनी व्यक्त केले.
प्रजापिता ब्रह्मकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय माऊंट आबु मार्फत संचालित स्थानिक केंद्रात महाशिवरात्रीनिमित्त आयोजित शिवजंयती कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, आयुष्यभर सोबत राहणारा एक घटक म्हणजे वृक्ष असून त्याची लागवड करुन संवध्रन करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा. जन्मापासून प्रत्येक क्षणाला सोबत राहून मृत्यूपर्यंत साथ देणाऱ्या वृक्षावर मनापासून प्रेम करण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
याप्रसंगी वनक्षेत्राधिकारी आर. एन. बारई यांचे हस्ते शिवध्वज फडकविण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक मधुकर गीते, डॉ. विक्रम राखडे, मंदार फडणवीस, मुख्याख्यापक अशोक पारधी, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
डॉ. विक्रम राखडे यांनी मानवाच्या जीवनात मनाचे महत्व कसे असते हे सांगुन अध्यात्माचे अनुसरणाने मानवाला शांतता प्राप्त करता येते. प्रत्येक धर्म अहिंसेला महत्व देत आहे. अहिंसेशिवाय जे घडले त्यालाच शांती म्हणतात, हे विषद केले.
पोलीस निरीक्षक मधूकर गिले व मंदार फडणवीस यांनी यावेळी समयोचित विचार व्यक्त केले.
यावेळी केंद्राच्या संचालिका ब्रम्हाकुमारी सुशिल दिदी यांनी शिवजयंती कशासाठी साजरी करावयाची, हे वेगवेगळे उदाहरण देवून समाजवून दिले. अशोक पारधी यांनी अतिथींचा परिचय देऊन स्वागतपर भाषण केले. बाल कलावंतांनी यावेळी नृत्य सादर केले. अतिथींचे स्वागत करण्यात आले. संचालन मधूकरभाई यांनी तर आभार उदाराम मांडवकर यांनी मानले. यावेळी नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)