शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट
2
सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट 
3
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
4
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, पतीने पत्नीला कुऱ्हाडीनं कापलं! नंतर पोलीस स्टेशनला जाऊन म्हणाला..
5
आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
6
जान्हवी कपूर विवाहबंधनात अडकणार? अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल; लग्नाची तारीख सांगितल्याची चर्चा
7
५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
8
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
10
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
11
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
12
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
13
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
14
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह
15
बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध
16
भारतीय कंपन्या रशियन तेलाची खरेदी घटवणार; अमेरिकेकडून वाढवणार, तज्ज्ञांची माहिती
17
भारतातून ३०० कोटींच्या शेणाची निर्यात; आंतरराष्ट्रीय बाजारात गायीच्या शेणाला मागणी
18
अमेरिकन कामगारांवर अन्याय, एच-१बी व्हिसा शुल्क विरुद्धचे खटले लढू; ट्रम्प प्रशासनाचा निर्धार
19
२५० कोटी व्याजासह जमा करा तरच म्हणणे ऐकू! मुंबई मेट्रोची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
20
झुबीनचा मृत्यू कशामुळे? सिंगापूर पोलिस देणार पुरावे, CCTV फुटेज अन् जबाब दहा दिवसांत मिळणार

निलंबित वनरक्षकाला राजकीय वरदहस्त ? शासकीय कार्यात अडथळा आणल्याचे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 20:31 IST

Bhandara : साकोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गस्तीवर असताना त्याना रेतीने भरलेला दहा चाकी टिप्पर दिसला. त्यांनी ताबडतोब पोलिस स्टेशन हद्दीतील पोलिस कर्मचाऱ्यांना ही माहिती दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मोहाडी तालुक्यातील जामकांद्री वनक्षेत्रात कार्यरत असलेल्या सुधीर तेजराम हुकरे या वनरक्षकावर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली होती. यावरूनच भंडारा वनविभागाचे उपवनसंरक्षक योगेंद्र सिंह यांनी १५ ऑक्टोबरला त्याच्या निलंबनाचे आदेश काढले होते. आता या निलंबित वनरक्षकाने प्रकरण दाबण्यासाठी राजकीय आधार घेत असल्याची बाब समोर आली आहे.

साकोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गस्तीवर असताना त्याना रेतीने भरलेला दहा चाकी टिप्पर दिसला. त्यांनी ताबडतोब पोलिस स्टेशन हद्दीतील पोलिस कर्मचाऱ्यांना ही माहिती दिली. माहितीच्या आधारे लाखनी पोलिसांचे पथक पेंढरी गावाकडून खुर्शीपार बांधगावाकडे निघाले. यात एका टिप्परच्या मागे एका चारचाकी वाहनाने पोलिसांच्या वाहनाला साइड दिली नाही. पोलिसांना चकमा देत रेतीचा टिप्पर तिथून पसार झाला.

पोलिसांनी वाहन चालकाला विचारणा केल्यावर टिप्पर हा हरीश शेंडे, रा. मन्हेगाव याच्या मालकीचा असल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी हरीश शेंडे (४०), सुधीर तेजराम हुकरे (३२), प्रीतेश बलवंत झलके (२४) आणि टिप्परचालक याच्याविरुद्ध अवैध रेतीची वाहतूक करणे, पर्यावरणाचे नुकसान करणे आणि शासनाचा महसूल बुडविल्याप्रकरणी पर्यावरण संरक्षण अधिनियमअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. आता मात्र हा हुकरे प्रकरण दडपण्यासाठी राजकीय नेत्यांकडे चकरा मारत असल्याचे दिसून आले आहे. कर्मचाऱ्यांच्या संगनमतानेच हुकरे रेतीची अवैध वाहतूक करीत असल्याचीही दबक्या आवाजात चर्चा आहे. यात ते कर्मचारी कोण, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. 

डीएफओंच्या आदेशात ठेवला होता ठपका

  • शासकीय सेवक म्हणून वन विभागात कार्यरत असताना सुधीर हुकरे हा रेतीची अवैध विक्री व वाहतूक प्रकरणात लिप्त असल्याची बाब समोर आली होती.
  • तसेच असे गैरकृत्य करीत असताना मुख्यालयात अनुपस्थित राहून शासकीय जबाबदाऱ्या पार पाडल्या नाहीत व वन विभागाची प्रतिमा मलिन केली, असा ठपका उपवनसंरक्षकांच्या आदेशात नमूद आहे.
English
हिंदी सारांश
Web Title : Suspended Forest Guard Seeks Political Favor? Obstructing Government Work Case.

Web Summary : A suspended forest guard, Sudhir Hukre, arrested for obstructing government work and illegal sand transport, is allegedly using political influence to suppress the case. Accusations include unauthorized absence and tarnishing the forest department's image.
टॅग्स :forest departmentवनविभागforestजंगलsandवाळूSmugglingतस्करी