पोलीस जनतेचे मित्रच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 00:13 IST2017-08-27T00:12:52+5:302017-08-27T00:13:09+5:30
पोलीस जनतेचे मित्र आहेत. मात्र कधीकधी जनतेचा पोलिसांवरील अविश्वास हा कामात अडथळा निर्माण करतो. बºयाच घटनांचा शोध नागरिकांच्या सहकार्याशिवाय होऊ शकत नाही.

पोलीस जनतेचे मित्रच
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : पोलीस जनतेचे मित्र आहेत. मात्र कधीकधी जनतेचा पोलिसांवरील अविश्वास हा कामात अडथळा निर्माण करतो. बºयाच घटनांचा शोध नागरिकांच्या सहकार्याशिवाय होऊ शकत नाही. तसेच उत्सव साजरे करतांनी नागरिकांचा सहयोग आवश्यक आहे. या उपविभागातील अवैध धंदे लवकरच बंद करु असे, अशी प्रतिक्रीया साकोली येथे नव्याने रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले यांनी दिली.
तान्हा पोळा शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस ठाणेकडून अवैध दारुविक्री करणाºंयांवर सात प्रकरणे दाखल करण्यात आली. यात २० हजार १३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आठ जणांवर प्रतिबंधकात्मक कारवाई करण्यात आली. अवैध दारुविक्रीवर आळा घालण्याचे दृष्टीने अवैध दारुविक्री करणाºया ३० इसमाना कलम ६८, ६९ प्रमाणे करण्यात आले.
तालुक्यात कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता पोळा व तान्हा पोळा उत्सव शांततेत पार पडला. त्यामुळे परिसरातील अवैध दारुविक्री कायमची बंद व्हावी यासाठी आमचे प्रयत्न सुरु असल्याचेही एसडीपीओ डिसले यांनी सांगितले.