तक्रार घेण्यास पोलिसांची टाळाटाळ
By Admin | Updated: February 26, 2015 00:24 IST2015-02-26T00:24:05+5:302015-02-26T00:24:05+5:30
कोणताही व्यक्ती तक्रार घेवुन आल्यास त्याची तक्रार घ्यावी त्याला परत पाठवु नये, असे शासनाच्या गृहमंत्रालयाचे आदेश असतांनाही मोहाडी प ोलीस ठाण्यात तक्रार कर्त्याला परत...

तक्रार घेण्यास पोलिसांची टाळाटाळ
मोहाडी : कोणताही व्यक्ती तक्रार घेवुन आल्यास त्याची तक्रार घ्यावी त्याला परत पाठवु नये, असे शासनाच्या गृहमंत्रालयाचे आदेश असतांनाही मोहाडी प ोलीस ठाण्यात तक्रार कर्त्याला परत पाठविण्याची प्रथा सुरु असल्याने शासनाच्या ‘त्या’ आदेशाची अवहेलना सुरु असल्याचे चित्र दिसत आहे.
तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी तसा आदेशच काढला होता. कोणताही व्यक्ती तक्रार घेवुन आला तर सर्वप्रथम त्याची तक्रार घ्यावी. तक्रार कोणत्या स्वरुपाची आहे हे ठरवुनच नंतर कारवाई करावी. तक्रार जर दुसऱ्या पोलीस ठाण्याशी संबंधित असेल तर तक्रार स्विकारून ती संबंधित ठाण्याकडे पाठवावी. मात्र, तक्रारकर्त्याला परत पाठवु नये असे स्पष्ट आदेश आहेत. मात्र मोहाडी पोलीस ठाण्यातुन अनेक लोकांना तक्रार न घेताच परत पाठविले जात असल्याची अनेकांची तक्रार आहे.
दिनांक २३ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता जहीमाबी सैय्यद (७८) ह्या घरगुती भांडणाची तक्रार देण्यासाठी नातवासोबत गेल्या असता त्यांची तक्रार घेण्यास स्टेशन डायरी अंमलदार धांडे याने नकार दिला. ह्या बाबत स्थानिक एका पत्रकाराने धांडे यांना तक्रार न घेण्याचे कारण विचारले असता तो तक्रार घेण्यास तयार झाला. मात्र, लेखी तक्रारीच्या दुसऱ्या प्रतिवर (ओसी) स्वाक्षरी करण्यास त्याने नकार दिला तसेच एका तासानंतर बिट जमादार गिरीपुंजे यांना स्वाक्षरी मागा असे सांगीतले. पोलीसांच्या जनतेप्रती असहकार वृत्तीमुळेच जनतेत पोलीसांप्रती सहानुभुती लुप्त होत असुन जनताही पोलीसांना सहकार्य करण्यास सहजासहजी तयार होत नाही. आणि एखाद घटना घडल्यास पोलीसांवर रोष काढल्या जातो. याला जबाबदार पोलीसांची अशीच कार्यप्रणाली कारणीभुत असते. याकडे पोलीस विभागाने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. (शहर प्रतिनिधी)
मोहाडीची सुरक्षा रामभरोसे
पोलीस ठाणे मोहाडी येथील ठाणेदार जोतीराम गुंजवटे हे मागील एक महिण्यापासुन रजेवर गेले आहेत. त्यांच्या ठिकाणी मधुकर गिते यांना पाठविण्यात आले होते. मात्र त्यांचीही बदली पवनी येथे करण्यात आली असल्याने ७० हजार नागरीकांच्या सुरक्षेची जबाबदारी आता रामभरोसे आहे. एपीआय दर्जाचे एकच अधिकारी असलेले सुहास चौधरी यांच्याकडे संपुर्ण ६७ गावांची जबाबदारी आली आहे. वैनगंगेच्या बलीकडील व येथुन ४५ कि.मी. दुर असलेल्या जंगलव्याप्त करडी क्षेत्राकडे लक्ष देण्यासाठी एकाच अधिकाऱ्याला तारेवरची कसरत करावी लागत आहे.