कंद खाल्ल्याने महिलांना विषबाधा
By Admin | Updated: March 2, 2015 00:42 IST2015-03-02T00:42:21+5:302015-03-02T00:42:21+5:30
आदिवासी बहुल येदरबुची येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमीच्या कामावरील सात ते आठ महिला मजूरांनी जंगलातील मटूरा कंद खाल्याने विषबाधा झाली.

कंद खाल्ल्याने महिलांना विषबाधा
तुमसर : आदिवासी बहुल येदरबुची येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमीच्या कामावरील सात ते आठ महिला मजूरांनी जंगलातील मटूरा कंद खाल्याने विषबाधा झाली. यातील एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. तिच्यावर तुमसर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्या महिलेचे नाव रत्नमाला जवीनलाल सोनगडे (४८) रा. येदरबुची असे आहे.
तुमसरपासून ३० किमी अंतरावर आदीवासी बहुल येदरबुची गाव आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत तलाव खोलीकरणाचे काम सुरु आहे. खोलीकरणात सात ते आठ महिलांना मटूरा कंद दिसला त्याला भाजून हा रानमेवा त्यांनी खाल्या. गुरुवारी दूपारी एक ते दीड नंतर त्यांना उलटीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्या घरी परतल्या यापैकी रत्नमाला सोनगडे यांची प्रकृती जास्त खालवली म्हणून त्यांना तुमसर येथे उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. अन्य महिलांनी गावातच उपचार कैल्याची माहिती आहे.
मटूरा कंदाचा बिनचादींचा मूळ असल्याने त्यांची विषबाधा झाली. ज्या महिलांनी जास्त प्रमाणात कंद खाल्ले त्यानाच विषबाधेचा त्रास झाला. नायब तहसिलदार अरविंद हिंगे यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन रत्नमाला सोनगडे यांची विचारपूस करुन माहिती घेतली. जंगलाशेजारील गावातील नागरिक रानमेवा खातात. पंरतु कोणते फळ घातक आहे याची माहिती त्यांना नसते म्हणून धोका होण्याची शक्यता असते. (तालुका प्रतिनिधी)