भंडारात शुद्ध पेयजलासाठी तातडीने उपाय योजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 06:00 IST2019-12-20T06:00:00+5:302019-12-20T06:00:33+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, नाग नदीमध्ये सोडण्यात येत असलेले नागपूर शहरातील सांडपाण्यामुळे वैनगंगा नदीतील पाणी दूषित होत आहे. नागपूर शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सुमारे १५०० कोटींचा एसटीपी प्रकल्प उभारण्यात येत आहे. हा प्रकल्प तयार होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे शुद्ध पाणी मिळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.

Plan immediate solutions for pure drinking water in storage | भंडारात शुद्ध पेयजलासाठी तातडीने उपाय योजना करा

भंडारात शुद्ध पेयजलासाठी तातडीने उपाय योजना करा

ठळक मुद्देआढावा बैठक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा शहर व पवनी तालुक्यातील नागरिकांना शुध्द पाणीपुरवठा करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्यात येतील. याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. तसेच भंडारा-गोंदिया जिल्हा एकत्रित पर्यटन विकास आराखडा, रिक्त पदे भरणे व रेती धोरणाची अंमलबजावणी बाबत कार्यवाही करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी संबंधित विभागांना दिल्या.
नागपूर विधानभवनातील मंत्री परिषद सभागृहात भंडारा जिल्हा आढावा बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, खासदार सुनील मेंढे, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे, मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भुषण गगराणी, विभागीय आयुक्त संजीवकुमार, जिल्हाधिकारी एम. जे. प्रदिपचंद्रन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, नाग नदीमध्ये सोडण्यात येत असलेले नागपूर शहरातील सांडपाण्यामुळे वैनगंगा नदीतील पाणी दूषित होत आहे. नागपूर शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सुमारे १५०० कोटींचा एसटीपी प्रकल्प उभारण्यात येत आहे. हा प्रकल्प तयार होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे शुद्ध पाणी मिळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी व पाणीपुरवठा विभागाने उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी दिली. तसेच वैनगंगा नदीतील जलपर्णी काढून नदी स्वच्छ करावी, असे त्यांनी सांगितले.
भंडारा व गोंदिया जिल्ह्यात पर्यटनाला मोठा वाव आहे. या दोन्ही जिल्ह्यांचा एकत्रित आराखडा तयार करावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली. भंडारा व तुमसर या शहराच्या रिंगरोडचे काम गतीने होणे गरजेचे आहे. त्यामुळे या कामाला प्राधान्य द्यावे असेही त्यांनी सांगितले. गटविकास अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी, यासोबत महसूल व इतर विभागातील पदे भरण्याबाबत आवश्यक कारवाई करावी अशी सुचना त्यांनी दिली.
जिल्ह्यात वाळू धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी, घरकुलासाठी पाच ब्रास रेती विनारॉयल्टी द्यावी अशी सुचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. तर खासदार मेंढे यांनी रिंगरोडसह पर्यटनाला चालना देण्याची मागणी केली. आमदार फुके यांनी वैनगंगेतील जलपर्णी हटविण्याची मागणी केली. आमदार भोंडेकर यांनी भंडारा येथील टोलनाक्यावरील वसुलीचा कालावधी संपल्याने हा टोलनाका बंद करावा, अशी मागणी केली तर आमदार कारेमोरे यांनी धानाला पाच हजार रुपये प्रती क्विंटल भाव देण्याची मागणी केली.

पीक विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांना द्या
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत निधी वाटप करण्यात येत आहे. ही मदत बँकेने कर्जापोटी कपात न करता शेतकऱ्यांना द्यावी, तसेच पीक विम्याची रक्कमही बँकानी कपात न करता थेट शेतकºयांना द्यावी, असे लेखी निर्देश जिल्हाधिकाºयांनी सर्व बँकाना देण्याबाबत सूचना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या बैठकीत दिली.

Web Title: Plan immediate solutions for pure drinking water in storage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी