स्केल प्रकल्पांतर्गत महिलांसाठी गुलाबी संध्या उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:31 IST2021-03-14T04:31:17+5:302021-03-14T04:31:17+5:30

गुलाबीसंध्या उपक्रमांतर्गत सहावी ते दहावीच्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी लाखनी तालुक्यातील ७८ गावांत कार्यक्रम घेऊन ...

Pink evening activities for women under the Scale project | स्केल प्रकल्पांतर्गत महिलांसाठी गुलाबी संध्या उपक्रम

स्केल प्रकल्पांतर्गत महिलांसाठी गुलाबी संध्या उपक्रम

गुलाबीसंध्या उपक्रमांतर्गत सहावी ते दहावीच्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी लाखनी तालुक्यातील ७८ गावांत कार्यक्रम घेऊन ५२८९ किशोरवयीन मुले, मुली व त्यांच्या कुटुंबीयांसह गावातील सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रकल्प व्यवस्थापक निकी प्रेमानंद यांनी मार्गदर्शन करताना मुलींना तसेच महिलांना आपले हक्क तसेच विविध व्यवसायांतील रोजगाराच्या संधीबाबत मार्गदर्शन केले. तालुका व्यवस्थापक वीरेंद्र देशमुख यांनी महिला व विद्यार्थिनींना शिक्षणाचा मूलभूत अधिकार तसेच समाजातील विविध महिलांनी घेतलेली गरूडझेप याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी मॅजिक बस इंडिया फाऊंडेशनतर्फे आयोजित केलेल्या उपक्रमाचे उपस्थित सरपंच व मान्यवरांनी भरभरून कौतुक केले. सूत्रसंचालन शाळा सहाय्यक अधिकारी विवेक मलोडे यांनी केले तर ममता तुपे यांनी आभार मानले. कार्यक्रमास गावातील महिला, पुरुष, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Web Title: Pink evening activities for women under the Scale project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.