आश्वासन हवेत विरले : नागरिकांच्या संयमाचा बांध फुटणारलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मे २०१७ पूर्वी राजीव गांधी चौक ते मुस्लिम लायब्ररी चौक हा मार्ग पायलट रस्ता म्हणून निर्माण करण्यात येईल ही घोषणा हवेत विरली की काय? असे स्पष्ट दिसत आहे. या रस्त्याचे बांधकामाऐवजी डांबराची मलमपट्टी करून येणाऱ्या पावसाळ्याला तोंड देण्याची तयारी झालेली आहे. भंडारा शहरातील अत्यंत रहदारीचा रस्ता म्हणून ओळखला जाणारा राजीव गांधी चौक ते मुस्लिम लायब्ररी मार्गाची ओळख आहे. हा मार्ग थेट मोठा बाजार परिसर व गांधी चौकाला जोडणारा आहे. या मार्गाचे दोन वर्षांपूर्वी डांबरीकरण बांधकाम विभागाकडून करण्यात आले होते. रस्त्यावर एकही खड्डा पडणार नाही याची गॅरंटी व वॉरंटी अभियंत्यांनीच दिली होती. मात्र वर्षभरातच या रस्त्याचे हाल झाले. मागील वर्षी पालिका प्रशासनाने या खड्ड्यांमध्ये चुरी व माती भरून एक वर्ष काढून घेतला. या नंतर हा रस्ता पायलट रस्ता म्हणून विकसीत करण्यात येईल असे आश्वासन पालिका पदाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र सद्यस्थितीत या रस्त्याची डांबराने डागडुजी करण्यात येत आहे. परिणामी नागरिकांची संयमता अजून तपासली जाणार आहे.
पायलट रस्त्याऐवजी डागडुजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2017 00:26 IST