पवनी वनपरिक्षेत्रात बिबट्याची शिकार!
By Admin | Updated: December 8, 2014 22:31 IST2014-12-08T22:31:02+5:302014-12-08T22:31:02+5:30
उमरेड - करांडला अभयारण्याला लागूनच असलेल्या प्रादेशिक वनपरिक्षेत्रातील नागंणगाव बिट अंतर्गत असलेल्या शेतामध्ये एक बिबट (मादी) मृतावस्थेत आढळला. या बिबटयाचे पायाचे चारही पंजे कापलेले आहेत.

पवनी वनपरिक्षेत्रात बिबट्याची शिकार!
पवनी : उमरेड - करांडला अभयारण्याला लागूनच असलेल्या प्रादेशिक वनपरिक्षेत्रातील नागंणगाव बिट अंतर्गत असलेल्या शेतामध्ये एक बिबट (मादी) मृतावस्थेत आढळला. या बिबटयाचे पायाचे चारही पंजे कापलेले आहेत. या बिबट्याची शिकार करण्यात आली असल्याचा प्राथमिक अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान या बिबट्यावर आज दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अत्यंत कडक सुरक्षा असतांनाही हा बिबट्या कसा मृत्यू पावला, त्याची शिकार तर झाली नसावी असा संशय व्यक्त केल्या जात होता. बिबट मृतावस्थेत असल्याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी डी.टी. दुडे यांनी घटनास्थळाला भेट दिली. यात या बिबट्याची शिकार झाल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
या बिबटयाची शिकार झाल्याची शंका असल्यामुळे एकूणच सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न निर्माण होत आहे. मृत बिबट हा पवनी - खापरी मार्गावरील गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्याच्या नागणगांव वन बिट क्षेत्रात असलेल्या एका शेतात आढळला होता. मृत बिबट ही मादी असून जवळपास आठ ते दहा दिवसांपूर्वीच तिचा मृत्यू झाला असावा, असे मृतदेहावरुन समजते. या बिबटयाचे तोंड उघडले असून गळा आवळल्याचे स्पष्ट दिसते. या बिबटयाचे पूर्ण चारही पंजे कापून नेल्याचे दिसत आहे.
वन्यजीव अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ही बाब निदर्शनास येवू नये ही बाब पचनी पडणारी नसून ही राखीव जंगला लगतच वन्य प्राणी असुरक्षीत असल्याने वनविभागाच्या कार्य प्रणालीवर प्रश्न चिन्ह लागले आहेत. (शहर प्रतिनिधी)