लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; दोन वर्षांपासून फरार आरोपी ताब्यात

By युवराज गोमास | Updated: April 7, 2026 17:47 IST2026-04-07T17:32:37+5:302026-04-07T17:47:24+5:30

Bhandara : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर जबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी तब्बल दोन वर्षांपासून फरार असलेल्या अजय रामप्रसाद यादव (३५, उत्तर प्रदेश) याला भंडारा पोलिसांनी ६ एप्रिल रोजी सायंकाळी शिताफीने अटक केली.

Physical relation on the pretext of marriage; Accused absconding for two years in custody | लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; दोन वर्षांपासून फरार आरोपी ताब्यात

Physical relation on the pretext of marriage; Accused absconding for two years in custody

भंडारा : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर जबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी तब्बल दोन वर्षांपासून फरार असलेल्या अजय रामप्रसाद यादव (३५, उत्तर प्रदेश) याला भंडारा पोलिसांनी ६ एप्रिल रोजी सायंकाळी शिताफीने अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पीडित महिलेने २७ जुलै २०२५ रोजी पोलिस स्टेशन, भंडारा येथे तक्रार दिली होती. त्यानुसार आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक रजनी तुमसरे करत होत्या.

तपासात आरोपीबाबत सुरुवातीला केवळ नावपुरती माहिती उपलब्ध होती. त्यामुळे तपासी अधिकाऱ्यांनी आरोपी आणि पीडित पूर्वी जिथे काम करत होते, त्या ठिकाणी चौकशी केली, तसेच NATGRID प्रणालीचा वापर करून आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने शोधमोहीम राबवली. अखेर काही दिवसांपूर्वी आरोपी भंडाऱ्यात परत आल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर अटकेची सापळा रचना करण्यात आली.

असा अडकला जाळ्यात

भंडाऱ्यात परत आलेला आरोपी हा नविन मुलीच्या शोधात होता. दरम्यान ६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी शास्त्री चौक येथे आरोपीला पोलिस कर्मचारी असलेल्या बनावट मैत्रिणीमार्फत गुपचुप खाण्यासाठी बोलविण्यात आले. तो येताय पीडितेकडून ओळख पटवण्यात आली आणि तपासी अधिकारी व पथकाने त्याला घेराव घालून ताब्यात घेतले.

कारवाई करणारे पथक

ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक निलेश मोरे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली, भंडारा पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वात पार पडली. पोलिस उपनिरिक्षक रजनी तुमसरे, पोलिस हवालदार आशिष तुमाने, गिता शेडे, रिना नागोलकर, नमीत सयाम, पेशने, चालक भाजीपाले यांनी ही कामगिरी फत्ते केली.

Web Title: Physical relation on the pretext of marriage; Accused absconding for two years in custody