अनुराग अध्यापक महाविद्यालयात व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:39 IST2021-08-24T04:39:40+5:302021-08-24T04:39:40+5:30

यावेळी व्यक्तिमत्त्व विकास या विषयावरील पावरपॉइंट प्रेझेंटेशन करताना प्रा. नरेश आंबिलकर यांनी मानवी व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा झाला याचा ...

Personality Development Workshop at Anurag Teachers College | अनुराग अध्यापक महाविद्यालयात व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा

अनुराग अध्यापक महाविद्यालयात व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा

यावेळी व्यक्तिमत्त्व विकास या विषयावरील पावरपॉइंट प्रेझेंटेशन करताना प्रा. नरेश आंबिलकर यांनी मानवी व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा झाला याचा क्रम समजावून दिला. शिक्षकाचे व्यक्तिमत्त्व हे अष्टपैलू असण्याची गरज सांगून शिक्षकांना स्वतःच्या हावभावापासून ते विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करण्याची किती गरज असल्याचे सांगितले. शिक्षकांनी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या बाबतीत अद्ययावत राहणे आज गरजेचे असून, पुस्तकांचे वाचन हे त्याच्या ज्ञानाचे प्रत्याभरणासाठी प्रयत्नरत असावे, असे सांगितले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना विविध चित्रफीत दाखवून व्यक्तिमत्त्व विकासाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिकवणी हे व्रत असून, शिक्षकांनी या व्रतासाठी आवश्यक कला, गुण आत्मसात करावे असे विचार प्राचार्य सुनंदा आंबिलकर यांनी सांगितले. यावेळी जागतिक पातळीवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महापुरुषांचे उदाहरण देऊन शिक्षण क्षेत्राचे अनेक पैलू विस्ताराने मांडण्यात आले. शिक्षक प्रशिक्षणार्थी अमेय पांचालो यांनी सूत्रसंचालन केले. पूजा उजवणे यांनी प्रास्ताविक केले, तर शेहेरबानो खान हिने आभार मानले. यावेळी शिक्षण प्रशिक्षणार्थी मोनिका ढबाले, दया मसंद, हिना लालवानी, कल्याणी कुंभारे, आदी उपस्थित होते.

230821\151-img-20210823-wa0050.jpg

मार्गदर्शन करताना प्रा नरेश आंबिलकर

Web Title: Personality Development Workshop at Anurag Teachers College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.