भंडारा जिल्ह्यात अस्वलाच्या हल्ल्यात इसम जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 12:09 IST2018-11-13T12:08:49+5:302018-11-13T12:09:24+5:30
जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात असलेल्या जेवनाळा या गावालगत मंगळवारी सकाळी ६ च्या सुमारास अस्वलाने केलेल्या हल्ल्यात एक इसम गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली.

भंडारा जिल्ह्यात अस्वलाच्या हल्ल्यात इसम जखमी
ठळक मुद्देमंगळवारी सकाळी ६ वाजताची घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा: जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात असलेल्या जेवनाळा या गावालगत मंगळवारी सकाळी ६ च्या सुमारास अस्वलाने केलेल्या हल्ल्यात एक इसम गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली. सकाळच्या वेळी राजू मानकर (४०) व सुकराम मानकर हे मासेमारीसाठी गेले असताना समोर अचानक अस्वल आले. या अस्वलासोबत तिची पिल्लेही होती. अस्वलाने त्याच्यावर हल्ला चढवून त्याच्या हाताचा चावा घेतला. या हल्ल्यात राजू मानकर यांचा डावा डोळ््यालाही जबर मार लागला आहे. या हल्ल्यानंतर अस्वल जंगलात पसार झाले. राजू मानकर यांना पालांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.