यशासाठी चिकाटी, आत्मविश्वासाची गरज
By Admin | Updated: May 22, 2016 00:23 IST2016-05-22T00:23:26+5:302016-05-22T00:23:26+5:30
कोणत्याही देशाची प्रगती त्या देशातील युवकांच्या कार्यावरून ठरविली जाते. खरं तर भारत देश हा युवकांचा देश आहे.

यशासाठी चिकाटी, आत्मविश्वासाची गरज
सुभाष रेवतकर यांचे प्रतिपादन: युवा नेतृत्व व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिराचा समारोप
भंडारा : कोणत्याही देशाची प्रगती त्या देशातील युवकांच्या कार्यावरून ठरविली जाते. खरं तर भारत देश हा युवकांचा देश आहे. युवाशक्ती राष्ट्राचे आधारस्तंभ आहेत. म्हणून जीवनामध्ये कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी युवकांची मेहनत, चिकाटी, सातत्य, जिद्द व आत्मविश्वास बाळगण्याची गरज आहे, असे प्रतिपादन नागपूर विभागाचे उपसंचालक सुभाष रेवतकर यांनी केले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, भंडारा यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर युवा नेतृत्व व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिराचे आयोजन ११ ते २० मे या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, भंडारा येथे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले.या शिबिराचे समारोपीय कार्यक्रम शुक्रवारला पार पडला. त्याप्रसंगी अध्यक्षीय भाषणातून ते बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा परिषद सदस्य अॅड.मधुकांत बांडेबुचे यांनी युवकांनी नोकरी किंवा उद्योजक क्षेत्रात करीअर करण्याचे अनुषंगाने योग्य नियोजन करून प्रयत्नांची पराकाष्टा करण्याची गरज असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप ईटनकर यांनी शासन निर्णयान्वये युवा धोरणाचा उद्देश व १० दिवस चाललेल्या युवा नेतृत्व व व्यक्तीमत्व विकास शिबिराबद्दलची माहिती विषद केली.
शिबिरामध्ये सीमा गोंडनाले यांनी समुदाय सहभाग, युवकांपुढील आव्हाने, जीवन कौशल्ये डिझाईन मेकिंग प्रॉब्लेम सॉल्विंग क्रियेटिव्ह थिंकिंग यावर मार्गदर्शन केले. सुधीर धकाते यांनी अॅग्रिकल्चर अँड एन्व्हॉयरमेंट, जलसंधारण व पाणलोट, प्रा.वामन तुरिले यांनी नेतृत्व गुण व्यक्तिमत्व विकास स्वच्छता अभियान करिता युवा पिढीचे योगदान, डॉ. सुहास गजभिये यांनी किशोरवयीन मुलामुलींमधीेल शारीरिक आणि मानसिक समस्यांसाठी जनजागृती, डॉ. सतीश भगत यांनी व्यसनमुक्ती माधुरी साखरवाडे यांनी युवक आणि समाज सामाजिक शिष्टाचार, डॉ. नितीन तुरस्कर यांनी कुटीर उद्योग, मधमाशी पालन विषयावर मार्गदर्शन केले.
निलेश नेवारे यांनी ग्राहकांचे अधिकार - बँकींग विषयी माहिती, विजय चव्हाण यांनी वाढती गुन्हेगारी आणि युवक, दहशतवाद, प्रा. नरेश आंबिलकर यांनी पर्सनालिटी डेव्हलपमेंट, बा. सू. मरे यांनी रोजगार व स्वयंरोजगार विषयी माहिती व विविध योजना व त्यांचे फायदे, डॉ. दिनेश हजारे यांनी सेल्फ अवेअरनेस, डॉ. सोनाली लांबट यांनी नेत्रदान व रक्तदान महत्व, डॉ. माधुरी खोमरे यांनी जीवनात योगांचे महत्त्व, डॉ. रत्ना मोगरे यांनी जेंडर सेन्सेटीव्हिटी किशोरवयीन मुलामुलींमधील शारीरिक समस्या, डॉ. विनिता चकोले यांनी सकस आहाराचे महत्व, प्रा. डॉ. राजेंद्र शाह यांनी व्यक्तिमत्व विकासामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे योगदान, आपत्ती व्यवस्थापन, रमेश अहिरकर यांनी नेहरु युवा केंद्राची युवक विकासातील भूमिका, प्रा. अनिल महल्ले यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, बी. के. खरमाटे यांनी उद्योग निरीक्षक जिल्हा उद्योग केंद्रातील विविध योजनांची माहिती व महत्व, मदन बांडेबुचे यांनी सामाजिक अंधश्रद्धा दूर करण्यासाठी युवा पिढीचे योगदान श्रीपत बांते, योगासनाचे महत्व याप्रमाणे तज्ज्ञ मार्गदर्शकांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच फिल्ड व्हिजिट अंतर्गत पर्यटन क्षेत्र रावणवाडी व श्रीराम राईस मिल, वाकेश्वर येथे सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिरासाठी क्रीडा मार्गदर्शक मीनल थोरात, क्रीडा अधिकारी मनोज पंदराम, क्रीडा मार्गदर्शक भोजराज चौधरी यांनी सहकार्य केले.
संचालन क्रीडा अधिकारी ए.बी. मरसकोले, तर आभार प्रदर्शन शिबिराचे समन्वयक क्रीडा अधिकारी त्रिवेणी बांते यांनी केले. (नगर प्रतिनिधी)