शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

रांगोळीतून कलावंतांच्या अनमोल कलेचे प्रदर्शन

By admin | Updated: January 6, 2016 00:50 IST

विविध कलात्मक रांगोळी चित्र रेखाटन करून कलावंतांनी आपल्या अनमोल प्रतिभा कलेचे प्रदर्शन केले आहेत.

रांगोळी उत्सवाचे थाटात उद्घाटन : जिल्हाधिकारी धीरजकुमार यांचे प्रतिपादनभंडारा : विविध कलात्मक रांगोळी चित्र रेखाटन करून कलावंतांनी आपल्या अनमोल प्रतिभा कलेचे प्रदर्शन केले आहेत. कला गुणांच्या बळावर प्रतिभेची चुणूक दाखविणाऱ्या या कलावंतांचे कार्य वाखाणण्यासारखे आहे. यांच्या प्रतिभा कलेचे प्रदर्शन बघून मी भारावून गेलो आहे. वैनगंगा महोत्सवातसुद्धा या कलावंतांनी कला प्रतिभेशी जिल्ह्यातील प्रेक्षकांना परिचित करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले. ३ जानेवारीला शितला माता मंदीर हॉल येथे आयोजित भव्य रांगोळी उत्सव कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवी केशवराव निर्वाण, लायन्स क्लबचे अध्यक्ष रामदास शहारे, ग्रीन हेरिटेज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहम्मद सईद शेख, प्रयासचे अध्यक्ष निकेत क्षिरसागर, आशिता क्लॉसेसचे आयोजक प्रकाश मुरकूटे, कुमार आर्टचे संचालक शरद लिमजे, अनुप भांडारकर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी हस्ते फित कापून रांगोळी प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी मोठ्या बारकाईने प्रत्येक रांगोळीचे निरीक्षण करून त्या विषयी माहिती घेतली व रांगोळी काढणाऱ्या प्रत्येक कलाकारांचे कौतुक केले. उद्घाटक व प्रमुख पाहुण्याचे पुष्पगुुच्छ व सन्मानचिन्ह देवून स्वागत करण्यात आले.केशवराव निर्वाण, रामदास शहारे, सईद शेख, निकेत क्षीरसागर आदींनी आपले मनोगत व्यक्त करून कलावंतांचे कौतुक केले. यावेळी चंदा मुरकूटे, शरद लिमजे, निता मालेवार, अनघा चेपे, कल्पना घुगल, हंसाताई वंजारी, दिपक कुंभरे, शेषकुमार शेंडे, शालू तिडके, मयुरी दुरूगकर, नूतन तिडके, शारदा लिमजे, सुरेखा खोब्रागडे, मयुरी लिमजे, प्रवीण कुंभारे, दिपाली गायधने, अनिता चौधरी, मोनू वाडीभस्मे, चेतना नेवारे, रवि उपरीकर, सुनिता धांडेकर, समृद्धी चेपे, सीमा हटवार आदी कलावंतांनी आकर्षक व कलात्मक विविध रांगोळी काढून आपल्या कलेचे प्रदर्शन केले असता जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या हस्ते या सर्व कलावंतांचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मान स्वीकारताना प्रत्येक कलावंतांच्या चेहऱ्यावर हास्य व आनंदाचा झरा ओसंडून वाहत होता. अनघा चेपे यांनी संचालन व आभार प्रदर्शन केले. गणेश वंदणावर आधारित नृत्याचे आशिता मुरकूटे, गार्वी रणदिवे, शर्वरी हटवार यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. यांना सुद्धा जिल्हाधिकारी हस्ते पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. अनेक महापुरूष, राधाकृष्ण, गणपती, झाशीची राणी लक्ष्मीबाई, वार्ली, मधुबनी, मिटकी, पैठणी साडी, टेन्सिल, सिनेरी, टु-डी, थ्री-डी, बिंदू, बेटी-बचाव अशा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या रूपात संदेश देणाऱ्या मनमोहक रांगोळी काढण्यात आले असून भंडारेकरांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.ग्रीन हेरिटेज संस्था भंडारा, नुपूर निकेतन संस्था नागपूर, कुमार आर्टस भंडारा व प्रयास संस्था व शितला माता मंदीर ट्रस्ट भंडारा आदीचे विशेष सहकार्य लाभले. शिबिराचे आयोजन ६ ते ९ जानेवारीपर्यंत राहणार असून यामध्ये आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहेत. रांगोळी प्रदर्शनी ९ जानेवारीपर्यंत खुली राहणार आहे.(प्रतिनिधी)