शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

जनतेने आध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:00 IST

पञ्ञा मेत्ता संघाचे कार्य आज अनेक राज्यात सुरु आहे. तीन वेळा दु:ख सहन केल्यानंतर चवथ्यांदा सुख मिळते. बौद्ध विहार अध्यात्मिक कार्याकरिता निर्माण केले जातात. आज जनतेनी आध्यात्मीक कार्याकडे जाण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पञ्ञा मेत्ता संघाचे अध्यक्ष भदंत संघरत्न माणके यांनी केले.

ठळक मुद्देसंघरत्न माणके : रुयाड महासमाधीभूूमी धम्म महोत्सवात उसळला जनसागर

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे, प्रेमामुळे रुयाड (सिंदपुरी) येथील महासमाधी भूमी महास्तुपाची आंतरराष्ट्रीय स्तराची वास्तू उभारता आली. पञ्ञा मेत्ता संघाचे कार्य आज अनेक राज्यात सुरु आहे. तीन वेळा दु:ख सहन केल्यानंतर चवथ्यांदा सुख मिळते. बौद्ध विहार अध्यात्मिक कार्याकरिता निर्माण केले जातात. आज जनतेनी आध्यात्मीक कार्याकडे जाण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पञ्ञा मेत्ता संघाचे अध्यक्ष भदंत संघरत्न माणके यांनी केले.
महासमाधू भूमी महास्तूप रुयाड येथे महासमाधीभूमी महास्तुपाचा १३ वा वर्धापन दिन पञ्ञा मेत्ता बालसदनाचा २९ वा व वाचनालयाच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त ३३ व्या धम्ममहोत्सवाचे आयोजनात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या भिक्खू जीवनाला ५० वर्षे झाल्याप्रसंगी सत्कारही करण्यात आला.
धम्म महोत्सवाचे उद्घाटन जपानच्या पञ्ञा मेत्ता कमेटीचे अध्यक्ष भदंत खोशो तानी यांच्या हस्ते करण्यात आले.
अखिल भारतीय भिक्खू संघाचे संघानुशासक भदंत सदानंद महास्थवीर यांच्या प्रमुख उपस्थितीत व पञ्ञा मेत्ता संघाचे अध्यक्ष भदंत संघरत्न माणके यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी आमदार नरेंद्र भोंडेकर, तेंदाई संघ जपानचे माजी अध्यक्ष भदंत योको निशिओका, तिबेटी बुद्ध विहार गोठणगावचे भदंत लेबझान तेंपा, शांती बुद्ध विहार वर्धाचे भदंत मिकीओ असाई, जपानचे भदंत खोदो कोंदो, भिक्खूनी म्योजिच्छू नागाकुबो, भदंत सत्यशील, भदंत नागदिपांकर, भदंत डॉ.धम्मदीप, भदंत महापंत, भदंत विनयरकिखता, भदंत बुद्धघोष, भदंत मेत्तानंद, भदंत डॉ.ज्ञानदीप, भदंत नागसेन, भदंत बोधानंद, भिक्खूनी विशाखा, भिक्खूनी शिलाचारा, खेमा कात्यायणी, मिलिंद फुलझेले, सरपंच माधुरी पचारे, भागयश्री येलमुले उपस्थित होते.
नीलज फाट्यावर बौद्ध भिक्खुंचे स्वागत करून धम्मरॅलीचे पवनी शहरात आगमन होताच शहरवासीयांनी स्वागत केले.
याप्रसंगी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी ही महासमाधी भूमी याच्या विकासाकरिता सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले.
अनेक सामाजिक संघटनेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. पञ्ञा मेत्ता शाळा व बालसदनाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन भीम व बुद्ध गीतांवर अप्रतिम नृत्य सादर केले. याला उपस्थितांनी टाळ्यांचा गजरात दाद दिली. प्रास्ताविक धम्मानंद मेश्राम, संचालन अ‍ॅड.महेंद्र गोस्वामी व आभार प्रदर्शन अ‍ॅड.गौतम उके यांनी केले.