महाविकास आघाडीच्या कारभारावर जनता समाधानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:26 IST2020-12-27T04:26:11+5:302020-12-27T04:26:11+5:30

भंडारा : महाविकास आघाडी सरकारने अनेक लाेकहिताचे निर्णय घेतले असून महाविकास आघाडीच्या कारभारावर राज्यातील जनता समाधान आहे. त्याचा फायदा ...

People are satisfied with the management of Mahavikas Aghadi | महाविकास आघाडीच्या कारभारावर जनता समाधानी

महाविकास आघाडीच्या कारभारावर जनता समाधानी

भंडारा : महाविकास आघाडी सरकारने अनेक लाेकहिताचे निर्णय घेतले असून महाविकास आघाडीच्या कारभारावर राज्यातील जनता समाधान आहे. त्याचा फायदा शिवसैनिकांनी घ्यावा, असे आवाहन राज्याचे वनमंत्री संजय राठाेड यांनी येथे केले.

शिवसेनेच्या जिल्हा मेळाव्याचे आयाेजन येथील बालाजी लाॅनमध्ये करण्यात आले हाेते. त्यावेळी ते बाेलत हाेते. मेळाव्याला जिल्हा संपर्क प्रमुख निलेश धुमाळे, जिल्हा प्रमुख अॲड. रवी वाढई, माजी सभापती नरेश डहारे, महिला आघाडी जिल्हा संघटिका आशा गायधने उपस्थित हाेते. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून लाेक हिताचे काम करीत असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध याेजना राबवित आहे. पूरग्रस्त आणि अतिवृष्टी शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यात आला आहे. काेराेना संकटाच्या काळात सरकारने सर्वसामान्यांना दिलासा मिळेल अशा याेजना राबविल्या, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक नरेश डहारे यांनी केले. यावेळी आशा गायधने, निलेश धुमाळ यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. संचालन संजय रेहपाडे यांनी तर आभार अनिल गायधने यांनी मानले.

यावेळी पुरुषाेत्तम टेंभरे, शेखर काेतपल्लीवार, अनिल गायधने, विजय काटेखाये, नरेश उचिबगले, अनिल सार्वे, प्रमाेद सार्वे, अरविंद बनकर, किशाेर चन्ने, सुरेश धुर्वे, सविता तुपटकर, रुपलता वंजारी, रेखा जयस्वाल, रश्मी पातुरकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित हाेते.

Web Title: People are satisfied with the management of Mahavikas Aghadi