शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्तीधारकांनी संघटितपणे न्यायासाठी लढा द्यावा

By admin | Updated: September 25, 2016 00:53 IST

निवृत्तीधारकाच्या वाढत्या वयात काठीचा आधार म्हणजे पेंशन. जे जमत नाही त्यासाठी जागृक राहुन

संघाचे अधिवेशन : एच.एफ. चौधरी यांचे प्रतिपादनजवाहरनगर : निवृत्तीधारकाच्या वाढत्या वयात काठीचा आधार म्हणजे पेंशन. जे जमत नाही त्यासाठी जागृक राहुन पेंशनमध्ये मिळणारी तफावत दुर करण्यासाठी संघटीत राहुन न्यायासाठी लोकशाही मार्गाने लढा द्यावा, असे प्रतिपादन एआयसीजीपीएचे सहायक राष्ट्रीय सचिव एच.एफ. चौधरी यांनी केले.अखिल भारतीय केंद्रीय सेवानिवृत्ती कर्मचारी संघ एच.क्यु. पुणे शाखा भंडाराच्या वतीने ठाणा पेट्रोलपंप येथील बावणकुळे सभागृहात ३ रे द्विवार्षिक अधिवेशन प्रसंगी सहायक राष्ट्रीय सचिव एच.एफ. चौधरी बोलत होते. अधिवेशनाचे उद्घाटन एआयसीजीपीएचे अध्यक्ष डब्ल्यु. एस. भोगे यांनी दिप प्रज्वलीत करून करण्यात आले. अध्यक्षस्थानी भंडारा शाखेचे अध्यक्ष व्ही.बी. मुनिश्वर हे होते. यावेळी संघटन सचिव बी.जे. सरवर, आयुध निर्माणी विद्यालय जवाहरनगरचे माजी मुख्याध्यापक एम.जी. कनेर, ई.बी. बावनकुळे, योग प्रचारक यशवंत गायधने, डी.बी. वसानी, डी.जे. दलाल, पी.एम. भुरे, एस.एन. कावळे, बी.एल. मांडेकर, आर.एल. कारेमोरे, नामदेव घरत उपस्थित होते. बी.जे. सरवर यांनी निवृत्तीधारकांना पेंशन वेतीरिक्त मिळणारे योजनेची माहिती सविस्तरपणे विसद केले. राष्ट्रीय अध्यक्ष भोमे म्हणाले की, केंद्रीय कर्मचारी निवृत्तीधारकांनी आपल्या परिवारातील इतंभु माहिती नमुना ३ भरून द्यावी, कुटूंबातील अपंग, अविवाहित, घटस्फोटीत, विधवा मुलींना पेंशनचा लाभ मिळतो हे विशेष करून आपल्या संभाषणात सांगितले.याप्रसंगी पेंशनरला घरभाडे, वैद्यकीय रक्कमेत वाढ, पेंशनरच्या वैद्यकीय खर्च सरकारने द्यावा. पे. मेट्रीक पेंशन त्वरीत लागू करून पेंशनरच्या खात्यात जमा करावी, अशी एकमुखी ठराव मंजुर करण्यात आले. यावेळी भंडारा शाखेच्या वतीने संघटनेशी संलग्न ७५ वर्ष वरील ३० केंद्रीय कर्मचारी निवृत्तीधारकांचा सत्कार उपस्थित पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक कोषाध्यक्ष के.यु. पोकडे यांनी केले. संचालन सचिव जी.जी. कावळे यांनी केले. आभार डी.के. लाड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जेष्ठ नागरिक संघ ठाणा जवाहरनगर, भंडारा शाखा यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)