शिक्षकांच्या प्रलंबीत समस्या निकाली निघणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:22 IST2021-07-03T04:22:51+5:302021-07-03T04:22:51+5:30

शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सैय्यद यांच्या नेतृत्वात खासदार सुनिल मेंढे, आमदार परिणय फुके यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेदरम्यान मुख्यकार्यकारी अधिकारी ...

The pending issue of teachers will be resolved | शिक्षकांच्या प्रलंबीत समस्या निकाली निघणार

शिक्षकांच्या प्रलंबीत समस्या निकाली निघणार

शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सैय्यद यांच्या नेतृत्वात खासदार सुनिल मेंढे, आमदार परिणय फुके यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेदरम्यान मुख्यकार्यकारी अधिकारी विनय मून, शिक्षणाधिकारी मनोहर बारस्कर उपस्थित होते. अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेले वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणीची प्रकरणे येत्या पंधरा दिवसात निकाली काढण्यसंबंधाने मागणी करण्यात आली. तसेच विषयशिक्षक, उच्चश्रेणी मुख्याध्यापक,केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांची रिक्तपदे भरण्याबाबतची कार्यवाही लवकरात लवकर करण्यात यावी, वैद्यकिय प्रतिपुर्तीची प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यासंबंधाने कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यासह इतर सर्व मागण्यासंबाधाने मुख्यकार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. ८ जुलैपर्यंत शिक्षक संघाच्या मागणीप्रमाणे संघटनांच्या पदाधिकारी यांची सभा लावून सर्वच मागण्यांचा निपटारा करण्यात येईल असे सांगितले. तेव्हा दिलेल्या अवधीमध्ये कारवाही झाली नाही तर विधानपरिषदेत संघाच्या सर्व मागण्यासंबाधाने आवाज उठवणार असल्याचे आमदार परिणय फुके यांनी स्पष्टपणे सांगितले.

शिक्षक शाळेत १० ते ३ या वेळेत ५० टक्के प्रमाणे उपस्थित राहतील, असा लगेच पत्र काढून पंचायत समितीला पाठविण्यात येईल असे सांगितले.

शिष्टमंडळात शिक्षक सोसायटीचे अध्यक्ष संजिव बावनकर, सुधीर वाघमारे, दिलिप बावनकर, शंकर नखाते, अनिल गयगये, राजन सव्वालाखे, नामदेव गभने, दिनेश घोडीचोर, प्रकाश चाचेरे, सुरेंद्र उके ,कैलास बुद्धे, अरविंद बारई, निशिकांत बडवाईक, सुधीर माकडे, महेश गावंडे, राधेश्याम आमकर,भाष्कर खेडीकर, रमेश लोणारे, शरद भाजीपाले, रोशन कराडे, दिगांबर जिभकाटे, हेमराज नागफासे, सुरेश हर्षे, दशरथ जिभकाटे, कोमल चव्हाण, उत्तम कुंभारगावे, गौरीशंकर वासनिक, ईश्वर निकुडे, अविनाश निखाडे, वनवास धनिस्कर, तुलशी हटवार, रामप्रसाद वाघ, वसंत काटेखाये, वसंत केवट, रामरतन भुरे, मधुकर लेंडे, दिनेश खोब्रागडे, प्रकाश वैरागडे, सुनिल शहारे, धोंडीराम हाके, राजू लांजेवार आदी उपस्थित होते

Web Title: The pending issue of teachers will be resolved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.