आता ग्रामपंचायत स्तरावर होणार वीज बिलाचा भरणा
By Admin | Updated: July 28, 2014 23:23 IST2014-07-28T23:23:15+5:302014-07-28T23:23:15+5:30
संग्राम कक्ष जिल्हा परिषद भंडारा यांचे पुढाकाराने अपना सीएससी सेवेतंर्गत ११० ग्रामपंचायत स्तरार २७ प्रकारच्या सेवांचा शुभारंभ नुकताच करण्यात आला असून अताा या सेवेत आणखी एका सुविधेची भर पडलेली आहे.

आता ग्रामपंचायत स्तरावर होणार वीज बिलाचा भरणा
भंडारा : संग्राम कक्ष जिल्हा परिषद भंडारा यांचे पुढाकाराने अपना सीएससी सेवेतंर्गत ११० ग्रामपंचायत स्तरार २७ प्रकारच्या सेवांचा शुभारंभ नुकताच करण्यात आला असून अताा या सेवेत आणखी एका सुविधेची भर पडलेली आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत मध्ये विज बिल भरणा करण्याची सुविधा अपना सीएससी अंतर्गत सुरू करण्यात आली आहे.
जिल्ह्यात सातही तालुक्यात अपना सीएससी सेवेचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांचे हस्ते करण्यात आला. सदर सेवेच्या माध्यमातून जिल्ह्यात ११० ग्रामपंचायत स्तरावर २७ सेवांचा लाभ संग्राम केंद्रातून नागरिकांना मिळत आहे. दरम्यान सध्या गाव स्तरावर बिल भरण्याची सुविधा नसल्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी येवून बिल भरण्याशिवाय पर्याय नसतो, त्यामुळे येण्या जाण्यात वेळ व पैसा खर्च होत आहे. सध्या अपना सीएससी सेवेचा लाभ घेत असलेल्या भंडारा जिल्ह्यातील पंचायत समिती लाखनी -मुरमाडी तुपकर, रेंगेपार, कोळी कोलारी. लाखांदूर- तावशी, चप्राड, रोहणी. पवनी- अड्याळ, निलज, कोसरा, तुमसर- सिहोरा, खापा, हसारा. मोहाडी- नेरी, मोहाडी, जांब. भंडारा- दाबा, जमनी, सुरेवाडा, पांढराबोडी. साकोली-सासरा, पिंडकेपार, परसटोला आदी ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये विज बिल भरणा करण्याचे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या सेवेमुळे गावस्तरावरील नागरिकांना ग्रामपंचायत मध्येच विज बिल भरता येणार असून त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करण्याचा त्रास वाचण्यासोबत आर्थिक बचत होणार आहे. उल्लेखनीय म्हणजे ग्रामपंचायत स्तरावर विज बिल भरण्याची सेवा सुरू झाल्यामुळे नागरिकांना बिल वेळेवर भरता येत आहे.
सध्या स्थितीत एकविस ग्रामपंचायतमध्ये सेवा सुरू झाली असून भविष्यात अधिकच्या असलेल्या ग्रामपंचायतमध्ये या सेवेचा विस्तार करण्याचा प्रयत्न असल्याचे संग्राम कक्षाचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक निषुम खरबीकर यांनी सांगितले. या सुविधांचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल द्विवेदी यांनी केले आहे. (प्रतिनिधी)