मानधन द्या; अन्यथा कामावर बहिष्कार
By Admin | Updated: July 17, 2015 00:33 IST2015-07-17T00:33:35+5:302015-07-17T00:33:35+5:30
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या प्रशिक्षणाला उपस्थित कर्मचाऱ्यांनी तहसिलदारांकडे यापूर्वी ग्रामपंचायत निवडणूक कामाचे मानधनाची मागणी केली.

मानधन द्या; अन्यथा कामावर बहिष्कार
पवनी : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या प्रशिक्षणाला उपस्थित कर्मचाऱ्यांनी तहसिलदारांकडे यापूर्वी ग्रामपंचायत निवडणूक कामाचे मानधनाची मागणी केली. मानधन मिळण्यासंदर्भात ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे सर्वांचे स्वाक्षरीसह तहसिलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे लेखी निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनानुसार, यापूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काम केलेल्या कर्मचाऱ्यांना मानधनाची संपूर्ण रक्कम येत्या ग्राम पंचायत निवडणुकीपुर्वी देण्यात यावी, अशी मागणी केली. मानधन न मिळाल्यास येत्या निवडणुकीचे कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे प्रशासनाला दिलेला आहे.
तहसिलदारांना भेटलेल्या शिष्टमंडळात शरद पाखमोडे, रवि बिलवणे, दिलीप वाणी, अनिल धारगावे, महा. प्रा. शिक्षक संघाचे सरचिटणीस हरिदास धावडे, प्रा. चरणदास बावणे, नितीन कुंभलकर, ईश्वर खंडाईत, भुपेश लांडगे, आनंद जिभकाटे, खुशाल गायधने, अरुण लाखे व अन्य कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)