शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
3
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
4
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
5
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
6
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
7
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
8
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
9
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
10
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
11
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
12
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
13
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
14
Dividend Stock: एका शेअरवर ७५ रुपयांचा डिविडंड देतेय 'ही' दिग्गज कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित, ब्रोकरेजनं वाढवलं टार्गेट
15
लग्नानंतर २६ वर्षांनी आर. माधवनने सांगितली पुरुषांची 'मन की बात'! पत्नीकडून असतात 'या' अपेक्षा
16
तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास ५० लाख दंड! ट्रायचे कठोर पाऊल; नवीन नियमावलीचा मसुदा जाहीर
17
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
18
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
19
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
20
बऱ्याच दिवसांनी दिसला परश्या, पुण्यातील इव्हेंटमध्ये रिंकू-आकाशची हजेरी; नंतर दोघांची धमालमस्ती
Daily Top 2Weekly Top 5

पवनीत आमरण उपोषण सुरू

By admin | Updated: June 25, 2014 00:15 IST

शिधापत्रिकेसंदर्भात वारंवार तक्रार करूनही समस्या न सुटल्याने अखेर जिल्हा परिषद सदस्या हंसा खोब्रागडे यांनी पवनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

पवनी : शिधापत्रिकेसंदर्भात वारंवार तक्रार करूनही समस्या न सुटल्याने अखेर जिल्हा परिषद सदस्या हंसा खोब्रागडे यांनी पवनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
आज उपोषणाचा पहिल्या दिवशी कुठल्याही अधिकाऱ्याने मंडपाला भेट दिली नाही. या संदर्भात संबंधित विभागाला आंदोलनासंबंधीचे निवेदन देण्यात आले आहे.
पवनी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप आहे. या विभागात जवळपास दोन वर्षांपासून शिधापत्रिकेसंबंधी अनेक प्रकरणे निकालात काढण्यात आली नाही. त्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळू शकला नाही. याची तक्रार या लाभार्थ्यांनी या क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्य हंसा खोब्रागडे यांच्याकडे केली होती. खोब्रागडे यांनी याची दखल घेत पवनीचे तहसीलदार यांचेशी भेट घेत प्रकरण मार्गी लावण्यासंबंधी चर्चा केली होती. त्या अंतर्गत दि. २२ जून पर्यंत प्रकरणे मार्गी न लागल्यास दि. २४ जून पासून तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा देण्यात आला होता.
तत्कालीन तहसीलदारांनीही यासंबंधी विशेष कारवाई केली नव्हती. लाभार्थ्यांना लाभ न मिळाल्याने त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला. शिधापत्रिकाच्या कामांना अजूनही सुरुवात झालेली नाही. याशिवाय गहाळ झालेल्या अर्जांची प्रकरणे अजूनही प्रलंबित आहेत. तसेच शिधापत्रिकाच्या कामाकरीता १०० रुपयाच्या मुद्रांकावर अर्ज करण्याबाबत कार्यालयातच संभ्रम आहे. तहसील कार्यालयातून जातीचे प्रमाणपत्र, क्रिमिलेअर, स्थलांतरण प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठीही हे आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान आज उपोषणाला प्रारंभ होताच पवनी तालुक्यातील विविध गावातून लाभार्थी उपोषण मंडपी गोळा झाले होते. तसेच पुरवठा कार्यालयातही या लाभार्थ्यांनी गर्दी केली होती. मात्र पुरवठा विभागातील कारकून सुटीवर असल्याने लाभार्थ्यांचा हिरमोड झाला. तहसीलदारही कामानिमित्त बाहेर असल्याने मागण्यांसंदर्भात तोडगा निघू शकला नाही. (तालुका प्रतिनिधी)