पवनीत काँग्रेसला आधाराची गरज
By Admin | Updated: July 11, 2015 01:40 IST2015-07-11T01:40:19+5:302015-07-11T01:40:19+5:30
नुकत्याच पार पडलेल्या पंचयत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक ७ जागा जिंकता आल्या.

पवनीत काँग्रेसला आधाराची गरज
सभापतिपदाची निवडणूक : काँग्रेसला सात जागा
पवनी : नुकत्याच पार पडलेल्या पंचयत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक ७ जागा जिंकता आल्या. १४ सदस्य संख्या असलेल्या पंचायत समितीमध्ये काँगे्रेस अर्ध्यावर आले परंतू सत्ता स्थापन करण्यासाठी पक्षाला आधाराची गरज आहेच.
काँग्रेसचे चिचाळ क्षेत्रातून मंगला रामटेके, अड्याळमधून मधू गभने, कोंढा क्षेत्रातून कल्पना गभने, आसगाव मधून मंगेश ब्राम्हणकर, मांगली क्षेत्रातून अर्चना वैद्य, कुर्झा क्षेत्रातून अल्का फुंडे व साकरला क्षेत्रातून बंडू उर्फ धनराज ढेंगरे निवडून आलेले आहेत. राष्ट्रवादीचे तोमेश्वर पंचभाई खैरी दिवाण क्षेत्रातून एकमेव सदस्य निवडून आलेले आहेत.
अपक्ष सदस्य निवडून आलेले आहेत. अपक्ष निवडून आलेल्या सदस्यात पिंपळगाव क्षेत्रातून वनिता नवघडे, आकोट क्षेत्रातून तुळशिदास कोल्हे व भुयार क्षेत्रातून राजकुमार मेश्राम निवडून आलेले आहेत. सत्ताधारी भाजपाला दोन जागेवर समाधान मानावे लागले. भाजपाचे तिर्री क्षेत्रातून अस्मिता सलामे व कोदूर्ली क्षेत्रातून मनोहर आकरे निवडणू आलेले आहेत. राष्ट्रवादीप्रमाणेच शिवसेनेला एकमेव जागेवर विजय नोंदविता आलेला आहे. ब्रम्ही क्षेत्रातून शिवसेनेच्या माधुरी मेश्राम निवडून आलेल्या आहेत.
काँग्रेसकडे निवडून आलेले ७ सदस्य आहेत तरीही त्यांना एका सदस्याचा आधार घ्यावा लागणार आहे. काँग्रेसला सभापतीपद स्वत:कडे ठेवून उपसभापती पदाचा त्याग करावा लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडे एक सदस्य असल्याने दोन्ही पक्षाचे एकमत झाल्यास काँग्रेस राष्ट्रवादीची युती होण्याची शक्यता आहे. अन्यथा काँग्रेसला अपक्षांना सोबत घेण्याचापर्यात खुला आहे. पक्षाचे वरिष्ठ नेले कोणता निर्देश देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. भाजप-सेनेला विरोधात बसण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. (तालुका प्रतिनिधी)