शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

भंडारा जिल्ह्यातील पवनीला पर्यटन विकासाची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 11:41 IST

भंडारा जिल्ह्यातील सर्वात जुनी नगरपरिषद अविकसित आहे. विकासाला गती द्यायची असेल तर पवनी व परिसराचा पर्यटनक्षेत्र विकास हाच पर्याय उरलेला आहे.

ठळक मुद्दे१५० हून अधिक प्राचीन मंदिरेऐतिहासिक वारसा लुप्त होण्याच्या मार्गावर

अशोक पारधी।आॅनलाईन लोकमतभंडारा : जिल्ह्यातले ऐतिहासिक महत्वाचे असलेले पवनी हा तालुका प्राचीन व मंदिराचे शहर म्हणून ओळखला जात आहे. भंडारा जिल्ह्यातील सर्वात जुनी नगरपरिषद अविकसित आहे. विकासाला गती द्यायची असेल तर पवनी व परिसराचा पर्यटनक्षेत्र विकास हाच पर्याय उरलेला आहे. शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक व आर्थिकदृष्ट्या अविकसीत असलेल्या नगरातील नगर पालिकेला १५० हून अधिक वर्षे झालेली आहेत.नगरात १५० पेक्षा अधिक मंदिर अद्यापही सुस्थितीत आहेत. त्यापैकी काही दुर्लक्षित आहेत. वैनगंगा नदी किनाºयावरील वैजेश्वर घाट, दिवाणघाट, ताराबाईचा घाट व पवनखिंड (खिडकी) असे महत्वाचे घाट आहेत. प्राचीन जवाहर गेट व परकोट आहे. ११ गरूड खांब आहेत. पुरातत्व विभागाने उत्खनन करून शोधलेले भव्य असे बौद्ध स्तुपाचे अवशेष आहेत. नगरात विदर्भातील अष्टविनायकापैकी एक असे पंचमुखी सर्वलोभद्र गणेश आहे. सोबतीला महाकाय रांजीचा गणपती व धरणीधर गणेश सुद्धा आहे. दसरा उत्सवासाठी प्रसिद्ध असलेल्या परिसरात चंडीका माता, नदीकाठावर दुर्गा माता, गावातील मध्यवर्ती ठिकाणी एकविरा माता, कुरहडा तलावालगत भंगार माता, कोरंभी रोडवरील टेकडीवर कालका व ज्वाला माता, जगन्नाथ मंदिर, दत्त मंदिर, मुरलीधर मंदिर, बालाजी मंदिर, वैजेश्वर मंदिर, निलकंठेश्वर मंदिर, पाताळेश्वर मंदिर, राम मंदिर, धोबी तलाव, मारोती मंदिर, एकटांग्या हनुमान मंदिर, टेंभेस्वामीचे मंदिर, भूतेश्वर मंदिर आणि गधादेव मंदिर सुद्धा आहे. भगवान शंकराची पिंड असलेले कित्येक मंदिर नगरात वेगवेगळ्या नावाने ओळखले जात आहेत. असे मंदिर अस्तित्वात आहेत. एवढा सगळा वैभव पवनी नगरात असूनही पर्यटनक्षेत्र म्हणून गावाचा विकास होवू शकला नाही.तालुक्यात गोसेखुर्द इंदिरा सागर धरण, उमरेड पवनी, कºहांडला वन्यजीव अभयारण्य स्थळ येथील महासभाधिभूमी असे पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे स्थळ आहे. नगरात वर्षभर वेगवेगळ्या मंदिरात महाप्रसाद, भोजनदान, भजन कीर्तन व इतरही उत्सव सुरु असतात. परंतु सर्व पर्यटन क्षेत्राला एकसुत्रात बांधून त्यांचा विकास करावा असा दृष्टीकोण रुढ होवू शकला नाही. पवनीचा मागासलेपण अद्यापही कायम आहे. तालुक्याचे ठिकाण असले तरी दर्जेदार व उच्च शिक्षण मिळेल अशा शाळा महाविद्यालय नाही. तंत्रशिक्षणाची सोय नाही. वैद्यकीय शिक्षण तर नाहीच. पर्यटन व शिक्षण असे दोन पर्याय पवनी गावाला विकासाच्या वाटेवर घेवून जावू शकत असल्याने लोकप्रतिनिधींनी इच्छाशक्ती ठेवून पवनीच्या विकासाचा आराखडा तयार करण्याची गरज आहे.