‘फुटपाथ’ व्यावसायिकांना मिळणार ओळखपत्र

By Admin | Updated: January 17, 2015 01:14 IST2015-01-17T01:14:54+5:302015-01-17T01:14:54+5:30

शहरातील मुख्य बाजार परिसरात रस्त्यालगत अतिक्रम करून दुकाने थाटली आहेत. अशा फुटपाथ दुकानदारांना पालिका प्रशासन आता जागेसह ओळखपत्र देणार आहे.

'Pavement' will be issued to the business card holders | ‘फुटपाथ’ व्यावसायिकांना मिळणार ओळखपत्र

‘फुटपाथ’ व्यावसायिकांना मिळणार ओळखपत्र

प्रशांत देसाई भंडारा
शहरातील मुख्य बाजार परिसरात रस्त्यालगत अतिक्रम करून दुकाने थाटली आहेत. अशा फुटपाथ दुकानदारांना पालिका प्रशासन आता जागेसह ओळखपत्र देणार आहे. यासाठी पालिकेने फुटपाथ व्यावसायीकांकडून अर्ज मागितले आहे. त्यादृष्टिने सर्व्हेक्षण व व्हिडीओ चित्रिकरण सुरू केले आहे.
अतिक्रमण करणाऱ्या फुटपाथ व्यावसायीकांचे लोंढे वाढत आहे. याचा फटका शहर विकासालाही बसत आहे. फुटपाथवर व्यवसाय करीत असल्याने त्यांच्याकडून पालिकेला महसूलही प्राप्त होत नाही. त्यामुळे अशा दुकानदारांची नोंद पालिकेत व्हावी, व त्यांना कायमस्वरूपी जरी जागा उपलब्ध करून देऊ शकत नसले तरी, जिथे आहे तिथे त्यांच्या दुकानासाठी आवश्यक असलेली जागा मोजून द्यायची. यासाठी पालिका प्रशासनाने आता पुढाकार घेतला आहे.
फुटपाथ व्यावसायीकांना पालिकेने राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत रोड निश्चिती करून शहरातील अतिक्रमणधारक स्थायी व अस्थायी फेरीवाल्यांचे प्रत्यक्ष भेट घेवून सर्वेक्षण करणे सुरू केले आहे. पालिकेने अशा दुकानदारांना ओळखपत्र व जागेबाबत आवाहन केले असता ७०० अर्ज पालिकेला प्राप्त झाले आहे. यातील अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. सध्या दुकानदारांचे चित्रिकरण व फोटो काढण्याचा कार्यक्रम राबवित आहे. यानंतर पालिका प्रशासन ओळखपत्र देणार आहे.
हे ओळखपत्र फेरीवाला प्रवर्गातील दुकानदारांनाच मिळणार असून बाहेरगावाहून येऊन व्यवसाय करणाऱ्यांना यामुळे चाप बसणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.
फुटपाथ दुकानदारांची होणार नोंद
पालिका हद्दीतील रस्त्यांवर मागील अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून व्यवसाय थाटणाऱ्यांना पालिका त्यांच्या दुकानाला आवश्यक असेल तेवढीच जागा मोजून देणार आहे. यासाठी त्यांची नोंद पालिकेत रहावी, यासाठी व्हिडीओ चित्रिकरण करणे सुरू झाले आहे. फेरीवाल्यांचे संगणकीकृत नोंद पालिकेत होणार आहे. यानंतर त्यांना ओळखपत्र वितरीत करण्यात येईल. नोंदणी शुल्क व मासिक शुल्क दोनशे रूपये आकारण्यात येणार आहे.
फुटपाथ दुकानदारांच्या कौशल्य वृद्धीवर भर
शहरातील फुटपाथ व्यावसायिकांचा राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियानांतर्गत समावेश करून त्यांचा कौशल्यवृद्धीवर भर देण्यात येणार आहे. बीपीएलमधील दुकानदारांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन व बँकाच्या माध्यमातून कर्ज पुरवठ्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यामुळे शहरविकासाला चालना मिळणार आहे. यासाठी जनतेच्या सहकार्याची गरज आहे.
- रवींद्र देवतळे,
मुख्याधिकारी, नगरपालिका भंडारा.

Web Title: 'Pavement' will be issued to the business card holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.