शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
5
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
6
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
9
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
10
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
17
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
18
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
19
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
20
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

तलावाच्या पाळीला पडल्या भेगा

By admin | Updated: September 8, 2016 00:34 IST

जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत पाणी साठवण करण्याची महत्वाकांक्षी योजना राज्य शासनाने अंमलात आणली.

नरसिंगटोला येथील प्रकार : तुमसर वनविभागाने तयार केला तलाव, गुणवत्तेवर प्रश्नचिन्हतुमसर : जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत पाणी साठवण करण्याची महत्वाकांक्षी योजना राज्य शासनाने अंमलात आणली. तुमसर वनपरिक्षेत्राअंतर्गत जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जलसाठवण तलावाला पहिल्याच पाण्यात मोठे भगदाड पडले आहे. सध्या या तलावात अल्प प्रमाणात पाणी शिल्लक आहे. लाखोंचा निधी येथे वाया गेले. निकृष्ठ जलसाठवण तलाव केल्याचे येथे दिसून येते. अंदाजपत्रकानुसार कामे न झाल्याची येथे शक्यता आहे. तुमसर वनपरिक्षांतर्गत नरसिंगटोला येथे जलसाठवण तलाव उन्हाळ्यात तयार करण्यात आले. याची किंमत २ लक्ष ९० हजार इतकी आहे. ३० मीटर रुंद, ३० मी. लांब व ३ मीटर खोल असा हा जलसाठवण तलाव आहे. तलावाचे काम तांत्रीकदृष्ट्या सदोष आहे. तलावात जेथून पाण्याचा प्रवाह येतो तिथे पीचींगचे कामे करण्यात आली नाही. एकुण तलावाला सुद्धा पिचिंग केली नाही. तलावातील अतिरिक्त पाणी जाणाऱ्या मार्गावरही पिचिंग नाही. यामुळे तलाव क्षतीग्रस्त झाला आहे.या जलसाठवण तलावाला मोठी भेगा पडली आहे. येथून पाणी वाहून गेले. जलसाठवण तलावाचा मुख्य हेतु पाणी साठवण करण्याचा होता तो हेतु येथे पूर्ण झाला नाही. या तलावाच्या नविदा प्रक्रियेवरही एका कंत्राटदाराने प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. अंदाजपत्रकानुसार या जलसाठवण तलावाची कामे झाली नाही अशी माहिती आहे. पहिल्याच पावसात तलावाचा काही भाग वाहून गेला. यावरून जलसाठवण तलावाची गुणवत्ता कशी असेल हे दिसून येते. जेसीबीने जलसाठवणूक तलाव तयार करण्यात येतो. शासनाच्या नियमानुसार मोजमाप पुस्तीका असते. त्या मोजमाप पुस्तीकेवर संबंधितांनी कशी स्वाक्षरी केली हा मुख्य प्रश्न आहे. या प्रकरणाची उपवनसंरकाकडे तक्रार करण्यात आली आहे. परंतु अद्याप कारवाई झाली नाही. तुमसर वनपरिक्षेत्राव्यतिरिक्त इतरही वनपरिक्षेत्रात जलसाठवण तयार करण्यात आले आहे. राज्य शासनाचा हा ड्रीम प्रोजेक्ट असून स्वत: मुख्यमंत्री जलसाठवण तलावांचा आढावा घेतात. तर अशा तलावांचा कोण आढावा घेणार हा प्रश्न येथे उपस्थित होतो. (तालुका प्रतिनिधी)नरसिंगटोला येथील जलसाठवण तलावाचे काम नियमानुसार व तांत्रिकदृष्ट्या झाले आहे. तलावाला भेग पडली काय? याची पाहणी करण्यात येईल. नंतरच त्याविषयी बोलता येईल. तलाव व इतर ठिकाणी पिचिंगची तरतूद नाही.- ए.आर. जोशीवनपरिक्षेत्राधिकारी, तुमसर