सालई-नेरला रस्त्याचे खडीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:43 IST2021-07-07T04:43:38+5:302021-07-07T04:43:38+5:30
या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला व लोकप्रतिनिधींकडे अनेकदा निवेदन दिली; मात्र लोकप्रतिनिधी व प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे या ...

सालई-नेरला रस्त्याचे खडीकरण करा
या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला व लोकप्रतिनिधींकडे अनेकदा निवेदन दिली; मात्र लोकप्रतिनिधी व प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे या रस्त्याचे ये - जा करणाऱ्याला कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे साधे खडीकरणसुद्धा करण्यात आले नाही. लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाचे अधिकारी या प्रकरणाची दखल घेत नसल्याने रस्त्याचे तीन तेरा झाले आहे. सालई खुर्द हा रस्ता आंधळगावला जोडणारा मुख्य रस्ता आहे. आंधळगाव शहर असल्याने येथील बाजारपेठेला मोठे महत्त्व प्राप्त आहे. कृषी साहित्य, पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र, बँक, आठवडी बाजार, शाळा-महाविद्यालय, किराणा बाजार, जनरल स्टोअर्स, किराणा स्टोअर्स, मेडिकल अशा विविधपटीने आंधळगाव शहराला महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच या रस्त्याने जाणाऱ्या शेतकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.