शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेगाड्या जाताहेत प्रवाश्यांनी हाऊसफुल्ल

By admin | Updated: November 2, 2014 22:30 IST

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊ न रेल्वेगाड्यातील टीसींनी पैसे कमविण्याचा नवीन फंडा काढला आहे. ५० रुपये द्या आणि द्वितीय श्रेणीच्या डब्यातून प्रवास करा, असे त्यांचे ब्रीदवाक्य आहे.

भंडारा : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊ न रेल्वेगाड्यातील टीसींनी पैसे कमविण्याचा नवीन फंडा काढला आहे. ५० रुपये द्या आणि द्वितीय श्रेणीच्या डब्यातून प्रवास करा, असे त्यांचे ब्रीदवाक्य आहे. हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत असून, कधी- कधी प्रवाश्यांना १०० रुपयेसुध्दा द्यावे लागतात. सणांमुळे प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे रेल्वेगाडया हाउसफुल्ल आहेत. दोन महिन्यांपासून काही गाड्यांचे आरक्षण मिळणेही कठीण झाले आहे. साधारण श्रेणीच्या डब्यांत नेहमीच पाय ठेवण्यासाठी जागा मिळत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून, नाइलाजास्तव द्वितीय श्रेणीच्या डब्यातून प्रवास करावा लागत आहे. टीसीकडून सर्रास वसुली केली जात आहे. साधारण श्रेणीची तिकीट असताना द्वितीय श्रेणीच्या डब्यात सापडल्यास प्रतिव्यक्ती ५० रुपये घेऊ न कारवाई न करता सोडले जात आहे. यातून दररोज हजारो रुपयांचा गोरखधंदा सुरू असून, याकडे रेल्वे प्रशासनातील वरिष्ठांचे दुर्लक्ष होत असल्याने ५० रू पये द्या अन् द्वितीय श्रेणीच्या डब्यातून प्रवास करा, हा नारा सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.मुंबई - हावडा रेल्वेमार्गावर असलेल्या नागपूर, भंडारा, गोंदिया, तुमसर येथे नियमित प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कर्मचारी असल्याने मासिक पास काढून रेल्वेने प्रवास करीत आहेत. मात्र, सणामुळे रेल्वेगाड्या हाउसफुल्ल असल्याने दररोज प्रवास करणाऱ्यांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. काही जणांनी टीसींशी मधुर संबंध प्रस्थापित करू न आपली सोय करू न घेतली असून, साधारण श्रेणीची मासिक पास असताना नियमांची पायमल्ली करू न द्वितीय श्रेणीच्या डब्यातून प्रवास केला जात आहे. हीच संधी साधून काही टीसींनी कारवाईची मोहीम उघडली आहे.जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा देण्याचा दावा करणाऱ्या रेल्वे बोर्डाच्या दुर्लक्षितपणामुळे प्रवाशांना अनेक अचडणींचा सामना करावा लागत आहे. सध्या सणामुळे रेल्वेगाड्या प्रवाशांनी हाउसफुल्ल आहेत. एसटी बसेस तसेच खासगी वाहनांमध्येही गर्दी असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. तुमसर रोड जंक्शन रेल्वेस्थानक प्रवाशांना फुलून दिसत आहे. सण महत्त्वाचा समजला जात असल्याने मजुरी करणारे, व्यापारी, नोकरी करणारे आपल्या गावाकडे जात असतात. रेल्वेचे भाडे कमी असल्याने सामान्य प्रवाशांचा कल रेल्वेकडे असतो. नागपूर ते रायपूर दरम्यान कोणतीही विशेष ट्रेन सोडण्यात आली नाही. मंगळवारपासून तुमसर रोड ते तिरोडी दरम्यान धावणाऱ्या टीटी ट्रेनमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. सकाळी साडेदहाच्या दरम्यान तिरोडीकडे जाणाऱ्या रेल्वेगाडीला एक पूर्ण व दोन अर्धे डबे जोडलेले होते. नागपूर व गोंदियाकडून जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी होती.या प्रवाशांकडे प्रवासाची तिकीटे होती. परंतु, गर्दीमुळे प्रवाशांना रेल्वेगाडीत प्रवासच करता आला नाही. वृध्दांना व लहान मुलांना या गर्दीचा त्रास सहन करावा लागतो. (प्रतिनिधी)