बँकेच्या उपाध्यक्षांविरुद्ध अविश्‍वास प्रस्ताव पारित

By Admin | Updated: May 24, 2014 23:22 IST2014-05-24T23:22:52+5:302014-05-24T23:22:52+5:30

जिल्हा बँकेच्या वाहनांचा दुरुपयोग करणे आणि अन्य कारणांवरून भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला अविश्‍वास प्रस्ताव शुक्रवारी पारित

Passed the no-confidence motion against the Vice Chairman of the bank | बँकेच्या उपाध्यक्षांविरुद्ध अविश्‍वास प्रस्ताव पारित

बँकेच्या उपाध्यक्षांविरुद्ध अविश्‍वास प्रस्ताव पारित

भंडारा : जिल्हा बँकेच्या वाहनांचा दुरुपयोग करणे आणि अन्य कारणांवरून भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला अविश्‍वास प्रस्ताव शुक्रवारी पारित करण्यात आला. वलथरे यांच्या विरोधात १५ मते पडली.

भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राष्ट्रवादी प्रणित गटाचा कब्जा असला तरी काही संचालक विरोधी गटातील आहेत. एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत वलथरे यांनी भाजपा उमेदवाराचा प्रचार केल्याचा आरोप आहे. दरम्यान मतमोजणी होण्यापूर्वीच वलथरे यांच्याविरुद्ध बँकेच्या १६ संचालकांनी अविश्‍वास प्रस्ताव सादर केला होता. त्यावर चर्चा करण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांनी २३ मे रोजी सभा बोलाविली होती. या सभेत १५ संचालकांनी वलथरे यांच्याविरुद्ध मतदान केल्याने अविश्‍वास प्रस्ताव मंजूर झाला. या प्रस्तावावर स्वाक्षरी करणार्‍या संचालकांपैकी विनायक बुरडे यांच्यासह स्वत: सदाशिव वलथरे, सत्यवान हुकरे, वासुदेव तिरमारे, अंजिराबाई चुटले आणि प्रशांत पवार हे सहा संचालक अनुपस्थित राहिले. बँकेचे उपाध्यक्ष निवडण्यासाठी सत्ताधारी गटाकडून आता लवकरच बैठक होणार आहे. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचा ताबा असला तरी लोकसभा निवडणुकीत भाजपाचे नाना पटोले विजयी झाल्याने भविष्यात बँक काबीज करण्यासाठी त्यांचे प्रयत्नरत राहील.

Web Title: Passed the no-confidence motion against the Vice Chairman of the bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.