शिक्षक समाज व्यवस्थेचा कणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 06:00 AM2019-09-15T06:00:00+5:302019-09-15T06:01:14+5:30

उत्कृष्ठ मार्गदर्शन आणि आपल्या सखोल अभ्यासातून लहान मुलांच्या जीवनाला आकार देण्याचे काम शिक्षक करतात. त्यांच्या मार्गदर्शनातून भावी पिढी तयार होत असून भारतीय समाज व्यवस्थेला दिशा देण्याचे कार्य शिक्षकाच्या माध्यमातून सुरु आहे. शिक्षक हा समाज व्यवस्थेचा कणा असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी केले.

The particle of the teacher society system | शिक्षक समाज व्यवस्थेचा कणा

शिक्षक समाज व्यवस्थेचा कणा

Next
ठळक मुद्देरमेश डोंगरे। भंडारा येथे जिल्ह्यातील ११ आदर्श शिक्षकांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भारतीय समाज व्यवस्था शिक्षणावर टिकून आहे. थोरपुरुषांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवल्यास त्यात शिक्षणाचे महत्व लक्षात येते. जीवनात शिक्षणाचे अनन्य साधारण आहे. ही जबाबदारी शिक्षकांनी उचलली आहे. उत्कृष्ठ मार्गदर्शन आणि आपल्या सखोल अभ्यासातून लहान मुलांच्या जीवनाला आकार देण्याचे काम शिक्षक करतात. त्यांच्या मार्गदर्शनातून भावी पिढी तयार होत असून भारतीय समाज व्यवस्थेला दिशा देण्याचे कार्य शिक्षकाच्या माध्यमातून सुरु आहे. शिक्षक हा समाज व्यवस्थेचा कणा असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी केले.
शिक्षण विभाग जिल्हा परिषद भंडाराच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, शिक्षण सभापती धनेंद्र तुरकर, समाजकल्याण सभापती रेखा वासनिक, महिला व बालकल्याण सभापती रेखा ठाकरे, बांधकाम व आरोग्य सभापती प्रेमदास वनवे, जिल्हा परिषद सदस्य नीलकंठ कायते, साकोलीच्या सभापती रोषणा नारनवरे व शिक्षणाधिकारी आर. एस. काटोलकर उपस्थित होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप यांनी शिक्षकाची जबाबदारी आणि कार्य याबाबत बोलताना अनेक उदाहरण दिले. शिक्षण सभापती धनेंद्र तुरकर यांनी त्यांच्या जीवनातील प्रसंग सांगून यशस्वी जीवनात शिक्षकाच्या मार्गदर्शनामुळे यश गाठल्याचे सांगितले. यावेळी जिल्ह्यातील ११ शिक्षकांचा सत्कार सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन करण्यात आले. प्राथमिक विभागातून ७, माध्यमिक विभागातून तीन व एक विशेष शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला. प्राथमिक विभागातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साहुलीच्या अनिता रहांगडाले, पेंढरीचे ज्ञानेश्वर लांडगे, सातोनाचे माधवी नंदनवार, नेरलाचे रामभाऊ गेडाम, वाडेगांव प्रेमलाल हातझाडे, पुयारचे डेव्हिडकुमार गजभिये, हसाराचे अशोक ठाकरे आणि माध्यमिक विभागातून अंबिर वंजारी, संदीप वहिले व बाळू चव्हाण व विशेष शिक्षक म्हणून रवींद्र फन्दे यांचा समावेश आहे.
प्रास्ताविक डी. पी. वाघाये व आभार पी. डी. गणवीर यांनी मानले. कार्यक्रमास उपशिक्षणाधिकारी राजभोज भांबोरे व विनायक वंजारी उपस्थित होते.

Web Title: The particle of the teacher society system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक