प्रवेशद्वारावर वाहनतळ : मार्गात अडथळे

By Admin | Updated: February 11, 2015 00:40 IST2015-02-11T00:40:33+5:302015-02-11T00:40:33+5:30

देशातील आदर्श रेल्वे स्थानकात (मॉडेल रेल्वे स्थानक) भंडारा रोड रेल्वे स्थानकाचे नाव आहे. परंतु आदर्श या संज्ञेचा अपमान होईल, अशी अवस्था आहे.

Parking on the entrance: obstacles in the way | प्रवेशद्वारावर वाहनतळ : मार्गात अडथळे

प्रवेशद्वारावर वाहनतळ : मार्गात अडथळे

लोकमत विशेष - ४
तथागत मेश्राम वरठी
देशातील आदर्श रेल्वे स्थानकात (मॉडेल रेल्वे स्थानक) भंडारा रोड रेल्वे स्थानकाचे नाव आहे. परंतु आदर्श या संज्ञेचा अपमान होईल, अशी अवस्था आहे. उंच भितीमुळे रेल्वे स्थानक दिसत नाही. प्रवेशद्वारावर सायकल स्टॅण्ड मालकाने कब्जा करून ठेवला आहे. त्यामुळे रस्ता सापडत नाही आणि धावतपळत रेल्वे दिसली तरी मार्गात लावलेल्या वाहनाची गर्दी व अडथळे यामुळे गैरसोय होते.
भंडारा रोड रेल्वेस्थानक रेल्वे प्रशासन व लोकप्रतिनिधीच्या उदासीन धोरणामुळे दुर्लक्षित आहे. हे रेल्वे स्थानक दीडशे वर्षे जूने आहे. लाखो रुपये विकास कामावर खर्च झाले परंतु वास्तवस्थिती वेगळी आहे. दिवसभर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. सुविधा मात्र नगण्य आहेत. मुख्य मार्गापासून रेल्वे स्थानक परिसरात पोहचेपर्यंत प्रवाशांना अडचणी आहेत. प्रवाशांच्या पैशातून रेल्वेला महसूल मिळतो. त्यातून कर्मचाऱ्यांना पगार मिळतो. परंतु, ज्यांंच्या पैशावर रेल्वे कर्मचारी जगतात तेच प्रवाशांच्या जीवावर उठले आहेत. मॉडेल रेल्वे स्थानक हे नाव केवळ नावापुरते ठरले असून रेल्वे प्रशासनाला कर्तव्याचा विसर पडला आहे.
नामफलक नाही
मुख्य रस्त्यावरून रेल्वे स्थानकात प्रवेश करताना जे मुख्य प्रवेशद्वार लागते त्या प्रवेशद्वारावर भंडारा रोड रेल्वेस्थानकाचा उल्लेखच नाही. फलकावर काहीच लिहिलेले नाही. याउलट रेल्वे स्थानक परिसरात कुठेही स्पष्टपणे दिसणारे फलक नाही. नव्याने येणाऱ्या प्रवाशांना इतरांना विचारून खात्री करून आतमध्ये प्रवेश करावा लागतो. येणाऱ्याला आपण कुठे आलो याबाबत शंका वाटावी, अशी अवस्था आहे.
दरफलकही नाही
रेल्वे स्थानकावर सायकल स्टॅण्ड चालकाचा मनमानी कारभार सुरू आहे. रेल्वे स्थानकावर वाहन ठेवणाऱ्यांकडून मर्जीने वसुली केली जात आहे. या स्टॅण्डवर दरफलक लावलेला नाही.
भंडारा रोड रेल्वे स्थानकाच्या बाहेरील आवारात व सायकल स्टॅण्डवर दिवसभर जुगार खेळणाऱ्याची गर्दी राहते.
सायकल स्टॅण्ड मालकाची मनमानी
रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या सोयीकरीता या रेल्वे स्टेशनवर रेल्वे विभागाने खासगी कंत्राटदाराला सायकल स्टॅण्डकरिता रेल्वेने दिलेल्या शेड बाहेर वाहने उभी ठेवायला नको. पण गत अनेक वर्षापासून या सायकल स्टॅन्ड चालकाची मनमानी सुरू आहे. रेल्वे स्थानकाच्या प्रवेश द्वारावर त्याने कब्जा केला आहे. अर्ध्यापेक्षा जास्त रस्त्यावर वाहने उभी असतात. त्यामुळे घाई गर्दीत निघणारे वाहने एकमेकावर आदळतात. या सायकल स्टण्ड चालकाची अरेरावी प्रवाशासाठी त्रासदायक आहे.
प्रवाशांना धन्यवाद देण्याची आठवण
भंडारा रोड रेल्वे स्थानकावर आत जाणाऱ्या फलकावर नाव नाही. पण चुकीने का होईना आपण आलात. आता बाहेर गेल्यावर येऊ नका, यासाठी धन्यवाद देणारे फलक आवर्जुन लावल्याचे दिसून येते. इनकमिंग नव्हे तर आऊटगोर्इंगवर का असेना रेल्वे प्रशासनाची नजर आहे, असेच म्हणावे लागले तर चुकले कुठे.
जीवघेणे अडथळे
भंडारा रोड रेल्वे स्थानकावरून प्रवास करूच नका याची संपूर्ण तयारी रेल्वे विभागाने करून ठेवल्याचे दिसते. रेल्वे स्टेशनच्या आत प्रवेश करण्यापूर्वीच्या रस्त्यावर ठिकठिकाणी अडथळे लावून ठेवण्यात आले आहेत. अडथळे अनेकांचे हाथ पाय तोडण्याच्या कामी पडत आहेत. रेल्वेने प्रवास करणारे बहुतांश कर्मचारी हे धावपळ करून रेल्वे पकडतात. यामुळे सदर अडथळे हे जीवघेणे ठरतात. या अडथळ्यामुळे प्रवाशांना सामान वाहून नेण्यास त्रास होतो. त्यातल्या त्यात रेल्वे स्थानक शोधत शोधत आत प्रवेश घेणाऱ्या प्रवाशांना हे रॉड लागल्यामुळे त्यांना नतमस्तक होवून समोर जावे लागते.

Web Title: Parking on the entrance: obstacles in the way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.