शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : परिणय फुके यांच्या भावाचे अपहरण करून मारहाण; नाना पटोले यांच्या गुंडांचे कृत्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 06:32 IST

नाना पटोले यांचा पुतण्या रिकी पटोले व काही गुंडांचे कृत्य Maharashtra Election 2019

भंडारा - भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि साकोली विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ. परिणय फुके यांच्या भावाचे अपहरण करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्या गुंडांनी केल्याची घटना शुक्रवारी रात्री साकोली  येथे घडली. लोकसभेवेळी पटोले नितीन गडकरी यांच्याविरोधात उभे राहिले होते. 

या घटनेबाबत थोडक्यात माहिती अशी की, डॉ. परिणय फुके यांचे लहान बंधू नितीन फुके हे प्रकाशपर्व पोस्ट ऑफिस जवळ साकोली या त्यांच्या राहत्या घरातून रस्त्याने जात असताना नाना पटोले यांचा पुतण्या रिकी पटोले व काही गुंडांनी नितीन यांना घेरले आणि मारहाण करीत वाहनात कोंबले. तेथून हे गुंड नितीन यांना पटोले यांच्या कार्यालयात घेऊन गेले आणि तिथेही त्यांना जबर मारहाण केली. या हल्ल्यात नितीन हे गंभीर जखमी झाले असून त्यांना साकोली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

पालकमंत्र्यांनाच जीवे मारण्याचा होता डाव : पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांचे अपहरण करून त्यांनाच जीवे मारण्याचा डाव नाना पटोले यांच्या गुंडांनी रचला होता, अशी धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. रस्त्याने पायी जात असलेल्या नितीन फुके यांनाच पटोले यांच्या गुंडांनी अंधारात पालकमंत्री समजून घेरले आणि जबर मारहाण केली. याप्रकरणी साकोली पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु होती.

टॅग्स :sakoli-acसाकोलीNana Patoleनाना पटोलेParinay Fukeपरिणय फुकेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019