आईवडिलांची सेवा,समाजऋणात दडला देव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 22:34 IST2018-01-11T22:34:11+5:302018-01-11T22:34:21+5:30

देव दगडात नसून, आईवडीलांची सेवा करा. त्यांचे ऋण फेडणे व समाजाची सेवा करून समाज ऋण फेडणे यातच देव दडला आहे. देवांच्या मूर्ती या भक्ताचे मन एकाग्र व्हावे म्हणून प्रतिक स्वरूप असतात, असे प्रवचन भागवतकार हभप तुलसीदास धर्माकर महाराज यांनी केले.

Parents service, social welfare schemes | आईवडिलांची सेवा,समाजऋणात दडला देव

आईवडिलांची सेवा,समाजऋणात दडला देव

ठळक मुद्देतुलसीदास धर्माकर : श्री लहरीबाबा पुण्यतिथी उत्सव उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : देव दगडात नसून, आईवडीलांची सेवा करा. त्यांचे ऋण फेडणे व समाजाची सेवा करून समाज ऋण फेडणे यातच देव दडला आहे. देवांच्या मूर्ती या भक्ताचे मन एकाग्र व्हावे म्हणून प्रतिक स्वरूप असतात, असे प्रवचन भागवतकार हभप तुलसीदास धर्माकर महाराज यांनी केले.
येथील संत श्री लहरीबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त तीन दिवसीय कार्यक्रमप्रसंगी प्रवचन करताना ते बोलत होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पुण्यतिथीचा उत्सव उत्साहात साजरा झाला. ८ जानेवारीला सप्तखंजरीवादक प्रबोधनकार, आकाशवानी, कीर्तनकार ११ वर्षीय तुलसीताई यशवंत हिवरे हिचे कीर्तन झाले. तिचे कीर्तन ऐकण्यास लोकांची तुफान गर्दी उसळली होती. गोपालकाल्याचे कीर्तन भुगाव पंढरपूर येथील हभप अनिल बारस्कर महाराज यांनी केले.
समारोपाचा कार्यक्रम माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते यांच्या अध्यक्षतेखाली झाला. याप्रसंगी माजी खासदार नाना पटोले, प्रसिद्ध साहित्यीक डॉ. हरिश्चंद्र बोरकर, लहरी मठदेवस्थानचे अध्यक्ष पत्रकार अशोक गुप्ता, सचिव खुशाल हुकरे, सुभाष मिश्रा, गंगासागर गुप्ता, परसराम गुप्ता हे सदस्य जि.प. सदस्य नेपाल रंगारी, नगरपरिषद अध्यक्ष धनवंता राऊत, उपाध्यक्ष तरूण मल्लानी, सदस्य मनीष कापगते, मीना लांजेवार, रोहिणी गुंगूलमारे, गीता बडोले, कीर्तनकार अहिल्याताई सोनकुसरे, संत डोमा कापगते, गीता कापगते व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती. प्रास्ताविक अध्यक्ष अशोक गुप्ता यांनी केले.
याप्रसंगी लहरीभूषण हा पुरस्कार संत डोमा कापगते महाराज रा.उमरी यांना प्रदान करण्यात आला. मानपत्र शाल श्रीफळ व एक हजार रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लहरी लीला या सिडीचे प्रकाशन याप्रसंगी करण्यात आले. लहरीबाबांशी संबंधी भुपाळी काकडा व स्तुती आदी गीते असलेली सीडी तयार करणारे डॉ. चेतन राणे यांचा सत्कार करण्यात आला. लहरी बाबा मठासाठी विशेष कार्य करणारे नंदलाल उराडे महाराज, भरत बावनकर, बळीराम आगाशे यांचाहीसत्कार करण्यात आला. संचालन राजु दुबे यांनी केले तर आभार खुशाल हुकरे यांनी केले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. सुमारे पंधरा हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Web Title: Parents service, social welfare schemes