शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
3
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
4
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
5
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
6
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
7
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
8
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

शहरात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ची संकल्पना राबविली कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 1:09 AM

भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ व्हावी हा उदात्त हेतू लक्षात घेऊन राज्य शासनाने सन २०१४ पासून रेन वॉटर हार्वेस्टींग ही संकल्पना शहरासह ग्रामीण भागात राबविण्यावर भर दिला आहे. मात्र कागदी घोड्यात मंजूर करून प्रत्यक्षात या संकल्पनेची अंमलबजावणी क्वचितच होत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देभंडारा : कामाचा ताण कायम, अपुऱ्या मनुष्यबळाअभावी तपासणीकडे दुर्लक्ष

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ व्हावी हा उदात्त हेतू लक्षात घेऊन राज्य शासनाने सन २०१४ पासून रेन वॉटर हार्वेस्टींग ही संकल्पना शहरासह ग्रामीण भागात राबविण्यावर भर दिला आहे. मात्र कागदी घोड्यात मंजूर करून प्रत्यक्षात या संकल्पनेची अंमलबजावणी क्वचितच होत असल्याचे चित्र आहे. भंडारा शहरात मोठ्या प्रमाणात इमारतींचे बांधकाम झाले असले तरी या संकल्पनेला समृद्ध रुप आलेले नाही.एकट्या भंडारा जिल्ह्यातील मागील सहा वर्षात ५०१ इमारत बांधकामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यात किती जणांनी जलपुनर्भरण कार्यक्रमांर्गत इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग ही संकल्पना कार्यरत केली. याबाबत संभ्रमता आहे. भंडारा नगरपरिषद कार्यालय, नगर रचना विभाग यांच्या मार्फत बांधकाम करण्याबाबतची परवानगी दिली जाते. मात्र पालिकेमध्ये मनुष्यबळाचा अभाव, वाढलेली कामाची व्याप्ती व अन्य कारणांमुळे परवानगी दिलेल्या किती इमारत बांधकामात रेन वॉटर हार्वेस्टिंगची संकल्पना २० टक्केच राबविण्यात आल्याचे समजते. नागरिक याबाबत अनुत्सुक दिसतात. सदर संकल्पना राबविण्याची जबाबदारी जितकी पालिकेची आहे तितकीच सामाजिक जबाबदारीही नागरिकांची असल्याचे बोलले जाते.नागरिकांचे सहकार्य आवश्यकभंडारा शहरात पालिका प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणेच घर बांधकाम करतेवेळी परवानगी दिली जाते. त्यात रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे अत्यंत गरजेचे व आवश्यक बाब म्हणून नमूद केली आहे. माझ्याकडे बांधकाम विभागाचा कार्यभार असल्यामुळे भंडारा शहरातील नवनिर्माणाधिन इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग होत आहे की नाही याची माहिती घेण्याचे कार्य मी सातत्याने करीत असतो. यासाठी नागरिकांचेही सहकार्य मिळणे अत्यंत आवश्यक आहे.-आशिष गोंडाणे, उपाध्यक्ष नगरपालिका, भंडाराही सामूहिक जबाबदारीपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जल, जंगल, जमीन, जानवर आदींचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. यात पाणी ही अत्यंत महत्वाची बाब असून पावसाचे पाणी वाहून न जाता त्याचे जतन करणे महत्वाचे आहे. पालिकेच्या निर्देशानंतरही बऱ्याच ठिकाणी इमारत बांधकाम करताना रेन वॉटर हार्वेस्टिंग या संकल्पनेला तडा दिला जातो. ही खरच गंभीर बाब आहे. याबाबत वेळीच दखल घेणे गरजेची बाब आहे. एकंदरीत ही संकल्पना राबविणे सामूहिक जबाबदारीचे कार्य आहे.-मो.सईद शेख, अध्यक्ष, ग्रीन हेरिटेज सामाजिक संस्था, भंडारा.असे केले जाते जल पुनर्भरणपावसाच्या पाण्याची साठवण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) म्हणजे पुनर्वापरासाठी पावसाचे पाणी जमा करणे. पावसाचे पाणी घराच्या छतावरून एका मोठ्या जमिनीखालच्या टाकीमध्ये गोळा करतात. तर काही ठिकाणी साठवावयाचे पाणी खोल खड्डा (विहीर, शाफ्ट किंवा बोअरहोल), पाझर असलेल्या जलाशयांत साठवतात. पाणी जाळी किंवा इतर साधनांसह दंव किंवा धुक्यातूनही गोळा केले जाते. हे माणसासाठी अपेय असलेले पाणी गार्डन, पशुधन, सिंचन वा घरगुती वापरासाठीजल पुनर्भरणाचे हे आहेत फायदेपाणीपुरवठ्यासाठी बाहेरील स्रोतांवर कमी प्रमाणात अवलंबून राहावे लागते. जलसंधारणामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढते.भूगर्भातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे, पाणी वर खेचण्यासाठी लागणाºया विजेच्या वापरात बचत होते. जमिनीखालील पाण्याच्या प्रदूषणाचे सौम्यीकरण झाल्यामुळे, पाण्याचा दर्जादेखील सुधारतो. जमिनीची धूप रोखण्यास काही प्रमाणात मदत होते.गच्चीवरील पाण्याच्या संधारणाच्या पद्धती तुलनेने अवलंबण्यास सोप्या आहेत. जलसंधारणाच्या बºयाच पद्धती या घरबांधण्यासाठी, वापरण्यासाठी आणि निगा राखण्यासाठी अतिशयनिसर्गात स्वच्छ आणि गोड्या पाण्याची कमतरता असल्यामुळे अधिक गोड्या पाण्याचा पुरवठा करणाºया पावसाच्या पाण्याचे नियोजन आवश्यक आहे.विद्यमान स्थितीत पुनर्भरण करण्यासाठी हजार ते १२०० रुपयापर्यंतचा खर्च करून ही संकल्पना कार्यान्वित करण्यात येत असते. विशेष म्हणजे सोशल मिडीयावर याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृतीही होत असल्याचे दिसून येते.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणी