लाच प्रकरणी तलाठ्याला अटक
By Admin | Updated: July 1, 2014 23:19 IST2014-07-01T23:19:46+5:302014-07-01T23:19:46+5:30
शेतीविषयक कामकाज पूर्ण करण्यासाठी चार हजार रुपयांची मागणी करणाऱ्या माडगी येथील तलाठी राजेंद्र रामचंद्र कदम याच्याविरुद्ध लाचलुचपत विभागाने कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली.

लाच प्रकरणी तलाठ्याला अटक
भंडारा : शेतीविषयक कामकाज पूर्ण करण्यासाठी चार हजार रुपयांची मागणी करणाऱ्या माडगी येथील तलाठी राजेंद्र रामचंद्र कदम याच्याविरुद्ध लाचलुचपत विभागाने कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली.
याबाबद असे की, तक्रारदाराने ग्राम शिवणी ता.तुमसर येथे असलेल्या १ हेक्टर ३१ आर शेतीपैकी बहिण देवांगणा गाढवे रा.कोष्टी हिला दीड एकर शेती लिहून दिलेली आहे. उर्वरीत शेती नावाने असली तरी ती वेगवेगळी करण्यात आलेली नाही. त्या शेतीवर पाच वर्षापूर्वी विहिर खोदून वॉटर पंप लावले आहे. परंतु या संबंधीची माहिती सातबारावर चढविलेली नाही. काम पूर्ण करण्यासाठी तलाठी रामचंद्र कदम यांनी चार हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने तलाठ्याला एक हजार रुपये दिले व उर्वरीत रक्कम काम झाल्यावर देण्याचे ठरले.
तक्रारदाराने तलाठ्याला दूरध्वनी करून कामाबाबद विचारणा केली असता त्यांनी २७ तारखेला तलाठी कार्यालयात भेटण्याचे सांगितले. त्यानुसार तक्रारदाराने संबंधित माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. विभागाने सापळा रचला.
तक्रारदाराने तीन हजार रुप यांची लाच तलाठ्याला देण्याचा प्रयत्न केला. मात्र तलाठी यांनी तलाठी कार्यालयासमोर असलेल्या किराणा दुकानदाराकडे लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली. ही कारवाई आज करण्यात आली. कारवाईदरम्यान तलाठी कदम यांनी तक्रारदारासोबत बोलण्याचे व भेटण्याचे टाळून लाच स्वीकारली नाही व पुढेही लाच रक्कम स्वीकारण्याची शक्यता दिसून येत नाही.म्हणून तुमसर पोलिसांनी तलाठी राजेंद्र कदम याला अटक करून त्याच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
कारवाई विभागाचे पोलीस उपायुक्त वसंत शिरभाते यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक प्रशांत कोलवाडकर, पोलीस उपअधीक्षक किशोर पर्वते, पोलीस निरीक्षक सहा. फौजदार हेमंत उपाध्याय, अशोक लुलेकर, गौतम राऊत, भाऊराव वाडीभस्मे, सचिन हलमारे, शेखर देशकर, रसिका कंगाले, मनोज चव्हाण यांनी पार पाडली. (नगर प्रतिनिधी)