शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

जिभेचे लाड करा कमी, हॉटेलिंग पडू शकते महाग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 05:00 IST

महिनाभराच्या कालावधीत व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर पुन्हा ४३ रुपयांनी वाढले आहेत. त्यातच खाद्यतेल आणि इतर वस्तूंच्या किमतींमध्ये देखील सातत्याने वाढ होत असल्याने हॉटेल व्यावसायिकांचे बजेट बिघडले असल्याने त्यांनासुद्धा दरवाढ केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच हॉटेलिंगचे दर वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे सर्वसामान्यांनासुद्धा जिभेचे लाड कमी करावे लागू शकतात.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मागील दोन तीन महिन्यांपासून घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. ऑक्टोबर महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर १९५६ रुपयांवर पोहचले आहे. सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे हॉटेल व्यावसायिकांचेसुद्धा बजेट बिघडले आहे. महिनाभराच्या कालावधीत व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर पुन्हा ४३ रुपयांनी वाढले आहेत. त्यातच खाद्यतेल आणि इतर वस्तूंच्या किमतींमध्ये देखील सातत्याने वाढ होत असल्याने हॉटेल व्यावसायिकांचे बजेट बिघडले असल्याने त्यांनासुद्धा दरवाढ केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच हॉटेलिंगचे दर वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे सर्वसामान्यांनासुद्धा जिभेचे लाड कमी करावे लागू शकतात. हॉटेलिंगच्या दरात वाढ होण्याचे संकेत शहरातील हॉटेल व्यावसायिकांनी दिले आहे.

गॅस सिलिंडरने ओतले महागाई तेल  - मागील तीन-चार महिन्यांपासून व्यावसायिक व घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सद्य:स्थितीत व्यावसायिक गॅस सिलिंडर १९१३ रुपये तर घरगुती गॅस सिलिंडर ९४५ रुपयांवर पोहचला आहे. गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने महागाईत भर पडत आहे. त्यामुळे अनेकांचे बजेट बिघडले आहे.

साराच खर्च वाढला

व्यवसायाची गाडी रुळावर येत असताना गॅस सिलिंडर, खाद्य आणि इतर वस्तूंच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. कोरोनामुळे मागील वर्षभरापासून व्यवसाय डबघाईस आला आहे. त्यामुळे दरवाढ केल्याशिवाय पर्याय नसून व्यवसाय करायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वाढत्या महागाईचा फटका केवळ सर्वसामान्यांना नव्हे तर हॉटेल व्यावसायिकांनाही बसत आहे.-सुरेश पंचभाई,  हॉटेल व्यावसायिक

 

टॅग्स :hotelहॉटेलCylinderगॅस सिलेंडर