सखींच्या बहारदार नृत्याने आणली रंगत

By Admin | Updated: January 12, 2016 00:40 IST2016-01-12T00:40:55+5:302016-01-12T00:40:55+5:30

सखी मंच शाखा पवनीतर्फे येथील लक्ष्मी-रमा सभागृहात सखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

Painted by the dancing dance of dancing | सखींच्या बहारदार नृत्याने आणली रंगत

सखींच्या बहारदार नृत्याने आणली रंगत

लोकमत सखी मंचचा उपक्रम : पवनी येथे सखी महोत्सव उत्साहात
पवनी : सखी मंच शाखा पवनीतर्फे येथील लक्ष्मी-रमा सभागृहात सखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात तालुक्यातील सखींनी नृत्य व एकपात्री नभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. सखी मिलन उत्सव उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन रमाताई फुलबांधे यांनी केले. अध्यक्षस्थानी वैजयंती गायकवाड तर अतिथी म्हणून पोले ह्या उपस्थित होत्या.
सुप्रिया रेहपाडे, सुरुची टेंभेकर, मंजुषा मांडवकर यांनी स्वागत गिताने पाहुण्यांचे स्वागत केले. यानंतर झालेल्या स्पर्धेत एकल नृत्यात प्रथम क्रमांक स्मिता मारवाडकर, द्वितीय क्रमांक जया नागुलवार व तृतीय क्रमांक ज्योती चिमणकर यांनी पटकाविला. एकल नृत्यात सहभागी रश्मी मारवाडकर, शारदा काटेखाये, जयश्री बावनकर, सुनिता धांदे व युगल नृत्यात प्रथम क्रमांक शालु हटवार, सुनिता धांदे, द्वितीय क्रमांक मनिशा गोमासे, त्रिवेणी गोमासे, तृतीय क्रमांक दुर्गा कांबळे, जयश्री बावनकर, तृतीय क्रमांक आदीवासी नृत्य, दुर्गा व अर्चना चिमणकर यांनी प्राप्त केला. समुह नृत्यात प्रथम क्रमांक प्रियदर्शनी ग्रृप ने पटकाविला. त्यात सहभागी सखी माधुरी हर्डे, संगिता अंबादे, शारदा काटेखाये, द्वितीय क्रमांक मॉ चंडिका ग्रुप यांनी प्राप्त केला. यात ज्योती ईटानकर, छाया ईटानकर व मंदा बावणे तृतीय क्रमांक जयश्री बावनकर, चिमणकर, मारवाडकर व कांबळे यांच्या सखी ग्रुप ने पटकाविला. एकपात्री अभियानात प्रथम क्रमांक जया नागुलवार, द्वितीय क्रमांक माधुरी हर्डे व तृतीय क्रमांक ममता बावनकुळे तर क्रीडा स्पर्धेमध्ये पोता रेस यात प्रथम क्रमांक आसगाव येथील निशा सावरबांधे, द्वितीय निमा भोगे, बॉल फेकने या स्पर्धेत प्रथम क्रमांक दीक्षा ठेंगरे, द्वितीय ज्योती केवट, तृतीय ममता बावनकुळे, टिकली व टकली स्पर्धेत प्रथम सविता चित्रीव आसगाव, द्वितीय गौतमी मंडपे व तृतीय क्रमांक मनिषा गोमासे, संगीत खुर्ची स्पर्धेत प्रथम क्रमांक रजनीगंधा सेलोकर, द्वितीय क्रमांक वैशाली पाटील व तृतीय क्रमांक वैशाली शोभने यांनी प्राप्त केला. ‘एक मी मवाली व टपोरी शो या स्पर्धेत प्रथम क्रमांक सविता चित्रीव (आसगाव), द्वितीय क्रमांक ज्योती अग्रवाल, तृतीय क्रमांक त्रिवेणी गोमासे, शिखा काटेखाये यांना मिळाला. संचालन ज्योती अग्रवाल यांनी तर आभार मंजू कहू यांनी मानले. विजेत्यांना तालुका संयोजिका अल्का भागवत यांनी अहवाल सादर केला. कार्यक्रमाचे नियोजन मनीषा गामासे, गौतमी मंडपे, मंजू कहू व माधुरी हर्डे यांनी केले. (मंच प्रतिनिधी)

Web Title: Painted by the dancing dance of dancing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.