पावसाळा अगदी उंबरठ्यावर आला आहे. शेतीच्या कामाची लगबग सुरु झाली आहे. परंपरागत पध्दतीने शेती कसण्यासाठी बैलांची आवश्यकता आहे. मात्र गोपालनाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याने बैलांची संख्या रोडावली आहे. परिणामी बैलबाजारात जनावरांचे भाव चांगलेच वधारले आहे. ...
दुचाकीस्वाराच्या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रॅव्हल्सला पेटवून दिल्याप्रकरणी खैरी पट येथील १७ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी केलेल्या मध्यस्थीनंतर मध्यरात्रीच्या सुमारास मृतदेह घटनास्थळावरुन हलविण्यात आला. ...
जीवनदायी वैनगंगा नदीचा प्रवाह गत काही वर्षांपासून गावाच्या दिशेने सरकत आहे. तिरावरील ४२ हेक्टर शेती नदीपात्रात गिळकृंत झाली आहे. संरक्षक भिंत बांधली नाही तर नदी तिरावरील सुमारे दहा गावांना धोका पोहचण्याची शक्यता आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने संरक्षक ...
वाकाटक राजेशाहीची, संस्कृतीची ओळख करून देणारे शिलाप्रकस्थ (डालमेंट्स) पवनी तालुक्यातील खैरी तेलोता पिंपळगाव येथे आहेत. अशाच प्रकारचे शिलाप्रकस्थ तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या पाहुनगावजवळील जंगलातील भातसरा तलावाजवळ आहे. ...
करडी परिसर लहान मोठ्या २८ तलावांनी समृद्ध आहे. मात्र, यातील मध्यम प्रकल्पांना अखेरची घरघर लागली आहे. घोटभर पाण्यासाठी दाहीदिशा भटकण्याची वेळ आहे तर लहान तलाव व बोड्यांत पाण्याचा ठणठणाट आहे. ...
मोफत व सक्तीचे शिक्षण योजनेंतर्गत सर्व निकष पूर्ण करणाºया बालकांचे प्रवेश वेटींगवर तर निकष पूर्ण न करणाऱ्यांना सवलत अशी अवस्था सध्या भंडारा जिल्ह्यात दिसत आहे. आरटीई प्रवेश प्रक्रिया सर्वांसाठी डोकेदुखी ठरत असून मोफत शिक्षण नव्हे बोगस शिक्षण प्रणाली ...
रेल्वे प्रवासात नियमबाह्य प्रवास करणाऱ्या तब्बल ११४ प्रवाशांवर गुरुवारी रेल्वे सुरक्षा दलाने कारवाई केली. त्यांच्याकडून १८ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला. दरम्यान मॅजीस्ट्रेट तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. ...
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात असलेला जलतरण तलाव गत वर्षभरापासून बंद आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील हा एकमेव प्रशिक्षण असणारे केंद्र बंद असल्याने जलतरणाचा सराव करण्यासाठी येणारे शेकडो बच्चे कंपनी आल्यापावली परत जात आहेत. ...
भरधाव ट्रॅव्हल्सने मोटारसायकलला धडक दिल्याने तरुण जागीच ठार झाल्याची घटना लाखांदूर येथील चुलबंद नदीच्या पुलावर गुरुवारी रात्री ८ वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी ट्रॅव्हल्स पेटवून दिली. नागरिकांची मोठी गर्दी अपघातस्थळी झाली होती ...
जिल्ह्यातील पवनी नगर प्राचिन व ऐतिहासिक नगर म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र येथे असलेल्या ऐतिहासिक वास्तुंचे जतन करण्यात प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...