वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर वीज वितरण कंपनीत लागलेल्या आणि अलिकडेच निलंबित झालेल्या एका तरूण लाईनमनने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना पवनी तालुक्यातील कोसरा (कोंढा) येथे सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. ...
जिल्ह्यातील रेतीघाटाच्या लिलावाला उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविण्यात आली असून आता लिलाव झालेल्या घाटातून रेती उत्खननाला परवानगी देण्यात आली आहे. यासंबंधीचे आदेश अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना दिले आहेत. ...
जिल्ह्यात आतापर्यंत खरीप पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टापैकी ४३ टक्के कर्जवाटप झाले असून भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आघाडी घेत आपल्या सभासद शेतकऱ्यांना उद्दिष्टाच्या ६४ टक्के कर्ज वितरीत केले आहे. याउलट राष्ट्रीयीकृत बँकांनी उद्दिष्टाच्या केवळ ...
ऐन परीक्षेच्या काळातच वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या पार्थिवाजवळ बसून रात्रभर अभ्यास केला. वडिलांच्या मृत्युचे दुख:ख हृदयात ठेवत दहावीची परीक्षा दिली. दोन दिवसापुर्वी लागलेल्या निकालात खैरीपटची प्रणाली मेश्राम ६४.६० टक्के गुण घेवून प्रथम श्रेणीत उत्त ...
पवनी तालुक्यातील तिर्री परिसरातील कमकाझरी, खैरी, तिर्री, शेगाव, मिन्सी, भिकारमिन्सी, पन्नासी या आठ गावातील शेतकऱ्यांना अनेक वर्षापासून ना गोसे धरणाचे, ना नेरला उपसा सिंचनाचे पाणी मिळाले नाही. सिंचनासाठी यापुढे तरी पाणी उपलब्ध होणार का नाही, याची ही श ...
स्थानिक युनिव्हर्सल अँड हायसिन्थ लिटील फ्लावर स्कूलची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी मिनाली योगराज देशपांडे हिने लाखनी तालुक्यात प्रथम येण्याचा व जिल्ह्यातून मागासवर्गीयातून प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. ...
दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातून अव्वल ठरलेल्या वरठी येथील वैष्णवी विजय हिंगे या विद्यार्थीनीने विविध संकटावर मात करून नेत्रदीपक यश संपादित केले. वडिलांच्या अचानक मृत्यूनंतर तिचा संघर्षाची कहाणी ऐकताना अंगावर काटा उभा राहतो. ...
तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील लाखनी शहराचे उपशहर असलेल्या मुरमाडी (सावरी) येथे दहा वर्षापूर्वी शासकीय इमारत आमदार निधीतून तयार करण्यात आली. सदर इमारतीचा उपयोग होत नसल्याने अवैध कामाचा केंद्र बनले आहे. ...
स्वच्छ भारत अभियान देशात राबविले जात आहे. रेल्वे प्रशासन रेल्वे प्रवाशी तिकीटावर 'एक कदम स्वच्छता की ओर' असे नमूद करीत आहे. परंतु तुमसर रोड येथे रेल्वे प्रशासनाकडून कचरा दररोज जाळणे सुरू आाहे. गोंदिया मार्गावरील रेल्वे क्रॉसिंग जवळ रेल्वे परिसरात हा ...