जिल्ह्याच्या व कर्मचाऱ्यांच्या समस्या लवकरच निकाली काढण्यात येतील, असे आश्वासन राज्याचे राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिले. यावेळी संघटनेच्या वतीने पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांना विविध विषयावर निवेदन देण्यात येवून चर्चा करण्यात आली. ...
गत पाच वर्षात माझ्या सरकारने अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण व बेरोजगारांसाठी मोठी कामे केली. शेतकऱ्यांना भरीव मदत दिली. गतवर्षी धानाला ५०० रुपये बोनस दिला. पुढील वर्षीही ५०० रुपये बोनस देण्यात येईल. उद्योगात महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणल ...
पवनी तालुक्यातल आसगाव परिसरात बरसलेल्या मुसळधार पावसामुळे ७७ घरांमध्ये पाणी शिरले. यात जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती विभागाने येथील १२५ लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. ढोरप येथे १५ घरांमध्ये पाणी शिरले असून तिथेही लोकांना अन्य ठिकाणी हलविण्यात आले. ...
शेतकऱ्यांना पाच वर्षात ५० हजार कोटी रूपयांचा मदतीचा हात दिला. देशातील सर्वात मोठी कर्जमाफी आमच्या सरकारने केली. शेवटच्या शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा होत नाही तोपर्यंत कर्जमाफी सुरूच राहील. सिंचनाचा आणि कृषीपंपाचा अनुशेष दूर करून शेतकऱ्यांना पीक विम्याच ...
शालेय सत्र सुरु झाल्यापासून भंडारा- जवाहरनगर या मार्गावर सकाळी व दुपारच्या सत्रात सुरु असलेल्या दोन बस बंद केल्या आहेत. आगार प्रशासनाने सदर बंद बस फेरी पुर्ववत सुरु करण्याची मागणी पालक वर्गाने संबंधीत प्रशासनाकडे केली. ...
देव्हाडी येथील उड्डाणपूल काटकोनमध्ये नसल्याने त्यात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याची माहिती पुढे आली आहे. पूल भरावातील राख पाण्यासह सतत वाहून जात आहे. गत चार वर्षापासून पुलातून राख वाहून गेली. त्यामुळे पूलावर भगदाड पडले होते. ...
केंद्र शासनाने देशातील ४१ आयुध निर्माणी कारखान्याचे निर्गमीकरण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या विरूद्ध आयुध निर्माणी कामगार संघटनेने तीव्र निषेध व्यक्त करून शुक्रवारी जवाहरनगर येथील आयुध निर्माणीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर मुंडण आंदोलन केले. ...
तांदूळ भरलेला भरधाव ट्रक उलटून झालेल्या अपघातात ट्रकचा वाहक जखमी तर ट्रकखाली दबून एक गाय ठार झाली. ही घटना मोहाडी येथील पावर हाऊसजवळ गुरूवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. ...
हंगामाच्या सुरूवातीला पावसाने दडी मारल्याने रोवणीची कामे ठप्प झाली होती. आता जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू असून सततच्या पावसाने रोवणीच्या कामात अडथळा येत आहे. आतापर्यंत एक लाख ८२ हजार हेक्टर क्षेत्रापैकी २९ हजार १२० हेक्टरवर म्हणजे लागवड क्षेत्राच्या १६ ...