प्रशासनाचा महत्वाचा विभाग म्हणून महसूल विभागाकडे पाहिले जाते. शासनाच्या कल्याणकारी योजना यशस्वीपणे राबविण्याची व समन्वयाची जबाबदारी महसूल विभागावरच आहे. ...
जुलै महिन्यात २० ते २५ दिवसांत पावसाचा पत्ता नव्हता. सर्व शेतकऱ्यांच्या आकाशाकडे नजरा लागल्या होत्या. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. दरम्यान वरूणराजाच्या कृपेने गत चार ते पाच दिवसांपासून जिल्हाभरात संततधार पाऊस बरसत आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षात केलेल्या लोकोपयोगी कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी राज्यभर महाजनादेश यात्रा काढण्यात येत असून ही यात्रा शनिवार ३ आॅगस्ट रोजी जिल्ह्यात येत आहे. भंडारा व तुमसर येथे सभेचे आयोजन केले आहे. ...
भंडारा-पवनी महामार्गाला एकमेव प्रवासी निवारा असा आहे की ज्यामध्ये ना बसायला जागा ना उभे रहायला.भर पावसात विद्यार्थी व प्रवाशांना उभे रहावे रहावे लागते. अड्याळ येथील प्रवासी निवारा समस्येच्या गर्तेत सापडला आहे. ...
नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रांतर्गत सीतासावंगी येथे उघडकीस आलेल्या वाघ शिकार प्रकरणी एका आरोपीने बुधवारी आत्मसमर्पण केले असून त्याच्या जवळून वाघ नख जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात आता आरोपींची संख्या १४ झाली आहे. ...
काही दिवसांपूर्वी मुंबईतील डोंगरी भागातील सुमारे ८० वर्षे जुनी इमारत कोसळून १४ नागरिकांचा बळी गेला. यानिमित्ताने पुन्हा धोकादायक इमारतींचा मुद्दा ऐरणीवर आहे. भंडारा शहरातील नगर पालिका हद्दीत ४४ इमारती जीर्ण झाल्या असून आतून पोकळ झाल्या आहेत. ...
जुलै महिन्याच्या अखेर पावसाने जिल्ह्यात हजेरी लावल्याने शेतशिवारात शेतकऱ्यांची रोवणीसाठी एकच धावपळ सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी शेतकरी मिळेल त्या साधनांनी चिखलणी करून मजुरांच्या सहाय्याने रोवणी करीत आहेत. ...
केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या ई-कार्डचे उद्दिष्ट दोन आठवड्यात पूर्ण करण्यात यावे. जिल्ह्याला ६ लाख ११ हजार ई-कार्ड बनविण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ...