मौर्य काळापासून थेट नागपूरकर भोसल्यांच्या इतिहासाची साक्ष देणारा पवन राजाचा पवनी येथील किल्ला पर्यटकांना खुणावत आहे. वैनगंगेच्या विशाल तीरावरील डोंगर माथ्यांनी वेढलेल्या या परिसरात सम्राट अशोकांचे काही काळ वास्तव्य होते. भंडारा जिल्हाचा समृद्ध वारसा ...
निसर्गाकडून प्रत्येक व्यक्ती आयुष्यभर आॅक्सिजन घेतो. परंतु निसर्गाने दिलेल्या या कर्जाची परतफेड करीत नाही. हे कर्ज फेडण्यासाठी घरी व परिसरात कमीत कमी दोन वृक्ष लावून निसर्गाच्या कर्जाची परतफेड करा, असे आवाहन पालकमंत्री चद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ...
अड्याळ येथील मागील बऱ्याच दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा सुरु आहे. पाणी विकत घेऊन प्यायची वेळ नागरिकांवर येवून ठेपली आहे. या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येते. ...
मागील दोन आठवड्यापासून पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने पालांदूर परिसरात रोवणीची कामे अंतिम टप्प्यापर्यंत पोहचली आहेत. दुसरीकडे मजुरांच्या टंचाईमुळे बळीराजाचे टेंशन मात्र वाढले आहे. ...
गोंडउमरी येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालय भंडाराचे अतिरिक्त प्रथम सत्र न्यायाधीश आर.पी. पांडे यांनी आरोपी सचिन पुंडलीक चांदेवार (२१) रा.गोंडउमरी याला तीन वर्षाचा सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ...
आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहचविण्यासाठी तसेच दिव्यांगांना एकत्र आणण्यासाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात मोहाडी येथे तालुका संपर्क कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. ...
सिहोरा परिसरात असणारा तुमसर बपेरा राज्य मार्ग आणि गावांना जोडणारे डांबरी रस्ते खड्डेमय झाले आहेत. या खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनाचे अपघात वाढली आहेत. शासनाने तत्काळ निधी मंजूर करण्याची ओरड परिसरात सुरु झाली आहे. ...
१३ गावांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या जलशुद्धीकरण केंद्राच्या सुरक्षा भिंतीला लागून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मुरूमाचे खनन करण्यात आले आहे. या अवैध खननामुळे जलशुद्धीकरण केंद्र धोक्यात सापडले आहे. खनन असेच होत राहिले तर शुद्धीक ...
निलज - पवनी राज्यमार्गावर दोन चारचाकी वाहनांचा आमोरासमोर धडकेत १० जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली. जखमींना पवनी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ...
अड्याळ पोलीस स्टेशन हद्दितील ६९ गावातील एकुण ४८ पोलीस पाटलांची तातडीची बैठक पोलीस स्टेशन अड्याळ येथे नुकतीच घेण्यात आली. त्यात प्रत्येक पोलीस पाटलांनी नवनियुक्त ठाणेदार सुरेश ढोबळे यांनी कुठे काय होत आहे, याची माहिती घेतली. तसेच अवैध व्यवसाय करणाऱ्या ...